नागपूर : हलबा समाज परिवारिक मंडळाच्या सर्व सदस्यांना सूचीत करण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या मंडळाच्या नवीन कार्यालयाच्या उदघाटन गुरुवार दि. 02.02.2023 ला सायंकाळी 4.00 वाजता राजेंद्र सोनकुसरे माजी नगरसेवक सभापती स्थापत्य व प्रकल्प समिती,मनपा सदस्य शिक्षण समिती यांचे हस्ते पार पडले . याप्रसंगी माजी आमदार धनराज कुंभारे प्रामुख्याने उपथीत होते. जवळ जवळ 100 सभासद व 25 महिला महिला सभासद उपस्थित होत्या. सर्वप्रथम अध्यक्षांनी राजेंद्र सोनकुसरे यांना मंडळा विषयी व नवीन कार्यालयाकरिता प्रत्येक सभासदांनी दिलेल्या मदतीविषयी माहिती दिली. या नंतर राजेंद्र सोनकुसरे यांनी सभासदांना संबोधित केले आणि मागील 23 वर्षांपासून मंडळाद्वारे राबविण्यात येत असलेल्या कामाची प्रशंसा केली व भविष्यात माझ्याने मंडळाकरिता जे काही सहकार्य करता येईल ते मी अवश्य करील असे आश्वासन दिले . या नंतर उपस्थित सर्व सदस्यांकरिता अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आली . उपस्थित सर्व सदस्यांनी स्वतःचे कार्यालय झाल्यामुळे आनंद व्यक्त केले. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार.
हलबा समाज परिवारिक मंडळाच्या नविन कार्यालयाचे उदघाटन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com