नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत रस्सीखेच स्पर्धेला सुरूवात झाली. रेशीमबाग मैदानात सुरू असलेल्या स्पर्धेचे सोमवारी उद्घाटन झाले.
उद्घाटन समारंभाला दी टग ऑफ वार असोसिएशनचे सचिव धैर्यशील सुटे, स्पर्धेचे कन्वेनर नागेश सहारे, समन्वयक नितीन शिमले, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ.पीयूष आंबुलकर, ज्योती देवघरे, सतीश वडे, श्रीकांत आगलावे, सचिन कावळे, प्रभाकर क्षीरसागर, अशोक चव्हाण, धनराज शिवरकर, प्रा. किशोर पाटील आदींची उपस्थिती होती. रस्सीखेच स्पर्धेमध्ये ५८ संघांनी सहभाग नोंदविला आहे.