नागपूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मिडास मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले.
वर्धा रोडवरील परसोडी गावा शेजारी स्थित अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा मिडास हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे वने ,पर्यटन मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. उद्घाटनानंतर फडणवीस आणि मुनगंटीवार यांनी या हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट देवून पाहणी केली.
यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मिडासचे प्रमुख डॉ.श्रीकांत मुकेवार यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. सौरभ मुकेवार यांनी हॉस्पिटलची माहिती देत सादरीकरण केले.