वाठोड्यात ‘घर चलो’ अभियानाचा शुभारंभ,ॲड. धर्मपाल मेश्राम यांची घरोघरी भेट

नागपूर :- नागपूर लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ भाजपा नागपूर तर्फे ‘घर चलो’ अभियान सुरू करण्यात आला. शुक्रवारी (ता.२९) भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी वाठोडा भागात ‘घर चलो’ अभियानाचा शुभारंभ केला.

ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी वाठोडा परिसरातील घरोघरी भेट देउन नागपूर शहरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विकासकामांचे माहितीपत्रक दिले तसेच ना. नितीन गडकरी यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन देखील केले.

या अभियानामध्ये वार्ड अध्यक्ष सुरेश बारई, बूथ अध्यक्ष किशोर सायगण, बूथ अध्यक्ष रवी जोगे, विक्रम डुमरे, मोसमी वासनिक, राजकुमार गुप्ता, रजत डोंगरे, कपिल वासनिक, नरेश बोकडे, महेंद्र बावणे, संदीप फुलझले, अनिल ठाकरे, सिद्धार्थ गायकवाड, सूरज लोणारे, धीरज यादव, ललित यादव, वासमवार, किशोर ढोणे, बालाजी वांढरे, सतीश यादव, मयुर खडके, अलका चौरसिया, चंदा धाबेकर, शिल्पा ढोणे, रमावती शर्मा, जयश्री जोगे, विजय तुरकर, माउली सेलोकर, राजेश शर्मा, तेठे, राजश्री खोडके, काव्या पिंपळकर, भैय्यालाल कोडपरे, राजू गोल्डे आदी सहभागी झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कार्यपालिका कर्तव्यात अपयशी ठरल्यास न्यायव्यवस्थेची जबाबदारी वाढते - न्या. बी.आर. गवई

Sun Mar 31 , 2024
– केंब्रिजमधील हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये व्याख्यान नागपूर :- देशातील कार्यपालिका जेव्हा आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरते तेव्हा देशातील न्यायव्यवस्थेची जबाबदारी वाढते. भारतातील न्यायपालिकेने वारंवार दाखवून दिले आहे की, जेव्हा कार्यपालिका आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरते तेव्हा आपली घटनात्मक न्यायालये हात जोडून बसू शकत नाहीत, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी हार्वर्ड केनेडी स्कूलमधील व्याख्यानात केले. संयुक्त राष्ट्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com