गुरुवारी शेतकरी आणि महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन; असे राहणार भारतीय विज्ञान काँग्रेसमधील कार्यक्रम

नागपूर :- राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरु असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या तिसऱ्या दिवशी शेतकरी आणि महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन, बाल विज्ञान संमेलन होणार आहेत. यासह विविध विषयांवरील परिसंवादांचे आयोजनही करण्यात आले आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात सकाळी 9.30 वा. शेतकरी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास पद्मश्री राहीबाई पोपेरे आय.एस.सी.ए. चे प्रमुख वैज्ञानिक डॉ.अनुपकुमार जैन, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.शरद गडाख, पशु दुग्ध व मत्स्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

मुख्य सभागृहात दुपारी 2 वा. पद्मश्री राहीबाई पोपेरे, उद्योजिका टिना अंबानी, कांचन गडकरी यांच्या उपस्थितीत महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन होणार आहे.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हॉलमध्ये सकाळी 9.30 सायं. 5.30 पर्यंत राष्ट्रीय बालविज्ञान संमेलनाचे कार्यक्रम होतील.

आजचे परिसंवाद

सकाळी 9 वाजेपासून परिसंवादांना सुरुवात होईल. त्यात- डॉ.ए.के.डोरले (औषधी विज्ञान विभाग) सभागृहात ‘अंत:स्त्रावी आणि कर्करोग जीवशास्त्रातील प्रगती (इन एन्डोक्राइन ॲड कॅन्सर बायोलॉजी)’ हा परिसंवाद होईल. अध्यक्ष भुवनेश्वर येथील बीरला ग्लोबल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रेमंदू पी. माथुर. सहभागी वक्ते- डॉ. मालिनी लालोराया, थिरुवनंतपुरम., प्रा. सुरेश येनूगु, हैद्राबाद विद्यापीठ, डॉ. शाहीद उमर,.

डॉ.रामानुजन (गणित विभाग) सभागृहात ‘सृजनात्मक संशोधन आणि कोविड नियंत्रणासाठी नियोजन आणि भविष्यातील विषाणुची महामारी’ (Innovative Research and Strategies to control Covid and Future Viral Pandemics) या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी सोनीपत (हरियाणा) येथील एस.आर.एम विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.एस.राजाराजन हे असतील.सहभागी वक्ते- प्रा. एस.पी. त्यागराजन, कोईम्बतूर. प्रा. डॉ. अभय चौधरी, हाफकिन इन्स्टिट्युट मुंबई, डॉ. शांथी साबरी, ऑस्ट्रेलिया.

रसायनशास्त्र विभागात मानवी आरोग्यामध्ये ग्लायकोबायोलॉजीचा परिणाम, रोग आणि कर्करोग उपचारपध्दती (Implications of Glycobiology in Human Health, Disease and Cancer Therapeutics) विषयावर परिसंवाद होणार आहे. कोलकत्ता (पश्चिम बंगाल) येथील वेस्ट बेंगॉल युनिव्हर्सिटी ऑफ टेकालॉजीचे प्रा.बी.पी.चटर्जी अध्यक्षस्थानी असतील. सहभागी वक्ते डॉ. विष्णूपाद चॅटर्जी, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट कोलकाता. डॉ. हाफिज अहमद, अमेरिका, प्रा. दीपक बॅनर्जी, अमेरिका. प्रा. यासूहिरो ओझेकी, जपान.

याशिवाय गुरुनानक भवन येथे सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 आणि दुपारी 2.00 ते 4.00 दरम्यान आर.एफ.आर.एफ. यांचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"पढे हम; पढ़ाए हम! अध्ययन केंद्र के विद्वान छात्र-छात्रावो को गुणवत्ता के आधार पर स्कूल बॅग वितरण !

Thu Jan 5 , 2023
सावित्री बाई फुले एवं फातेमा शेख के स्मरण में बाटे गए स्कूल बॅग ! स्थानीय यूनिवर्सल मल्टीपर्पज सोसायटी एवं फ़िक्र फाउंडेशन द्वारा संचालित मिशन यू एम एस/फ़िक्र इंडिया “पढ़ें हम; पढ़ाए हम! अध्ययन केंद्र राजनगर में साकारदृष्टि फाउंडेशन के सहयोग से विद्वान छात्र-छात्रावो को गुणवत्ता के आधार पर स्कूल बॅग वितरण कार्यक्रम किया गया ! इस अवसर पर गिट्टी खदान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com