यवतमाळ :- श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयात युरो सर्जरी शस्त्रक्रिया गृह विभागाचा शुभारंभ महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांच्याहस्ते करण्यात आला.
येथील अतिविशेषोपचार रुग्णालयाचे बांधकाम २०२० रोजी पूर्ण झाले आहे. राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनात तसेच वैद्यकिय आयुक्त राजीव निवतकर आणि वैद्यकिय संचालक डॉ.अजय चंदनवाले यांच्या प्रयत्नामुळे आज वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरिश जतकर यांच्या हस्ते युरो सर्जरी शस्त्रक्रिया गृह विभागाचा शुभारंभ झाला.
यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, अतिविशेषोपचार रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. रोहिदास चव्हाण उपस्थित होते. युरो सर्जरी शस्त्रक्रिया गृहाच्या शुभारंभानंतर सहाय्यक प्राध्यापक डॉ. किशोर टोंगे, वरिष्ठ निवासी डॉक्टर नवीन पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ. अभय गाणार, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अर्चना मेश्राम यांच्या चमुने पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रिया गृह शुभारंभा प्रसंगी सहयोगी प्राध्यापक डॉ. चेतन राठोड, सहाय्यक प्राध्यापक डॉ. संदीप चौरसिया, सहाय्यक प्राध्यापक, डॉ. भुषण अंबारे, परिसेविका वंदना बनकर, आशा चिकाटे व सर्व डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.