अपर मुख्य सचिवांच्या हस्ते जिल्हा कोषागारमध्ये ई-बिल, ई-व्हाऊचर कार्यप्रणालीचे उ‌द्घाटन

नागपूर :- लेखा व कोषागारे विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांच्या हस्ते जिल्हा कोषागार कार्यालय नागपूर येथे १५ डिसेंबर २०२३ रोजी ई-बील, ई-हस्ताक्षरासहित ई-व्हाउचर कार्यप्रणालीचे उद्घाटन झाले.

केवळ टेलिफोन, इलेक्ट्रसिटी देयकेच नव्हे, तर संपूर्ण देयके इलेक्ट्रॉनिकली सादर होतील याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच, सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आशिष कुमार सिंह यांनी केले.

लेखा व कोषागारे संचालक दिपा देशपाडे, सहसंचालक ज्योती भोंडे,स्वप्नजा सिदंकर, सहसंचालक (माहिती व तंत्रज्ञान) गिता नागर, वरिष्ठ कोषागार अधिकारी बालकृष्ण नायर, विशाल नलदूरकर, महेश घोडके आदी उपस्थित होते.

या कार्यप्रणालीमूळे आहरण व संवितरण अधिकारी यांना टेलीफोन, इलेक्ट्रीक, पाणी बिल, सारखी देयके इलेक्ट्रॉनिकली बील पोर्टलमधून कोषागाराला सादर करता येणार आहे. तसेच कोषागार कार्यालयालादेखील प्रमाणके इलेक्ट्रॉनिकली महालेखाकार कार्यालयाकडे सादर करता येणार आहे. या कार्यप्रणालीमुळे आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना संदेशवाहकावीना देयके कोषागारात इलेक्ट्रॉनिकली सादर करता येणार आहे. टप्या-टप्याने सर्व आहरण व संवितरण अधिकारी या सुविधेचा उपयोग घेवू शकणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शीत सत्र से किसी को कुछ भी नहीं मिला, NCP विधायक रोहित पवार का आरोप

Thu Dec 21 , 2023
नागपुर :- विधानमंडल के 14 दिवसीय शीतकालीन सत्र से न आम आदमी को कुछ मिला, न कर्मचारियों को, न किसानों को, न गरीबों व उपेक्षित लोगों को कुछ मिला. इस सत्र में सत्ताधारी मंत्रियों ने अपनी-अपनी कुर्सी बचाने का काम किया, जबकि नेताओं ने ही एक-दूसरे की आलोचना की. उन्होंने अधिवेशन को निरर्थक बताते हुए सत्ता पक्ष पर निशाना साधा. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com