पुरातत्व विभागाच्या ‘समृध्द भारतीय वारसा’ प्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर : भारतीय विज्ञान काँग्रेसच्या आयोजनानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभाग, केंद्र शासनाचा पुरातत्व सर्वेक्षण व उत्खनन विभागाच्यावतीने विद्यापिठाच्या आवारात ‘समृध्द भारतीय वारसा’ या विषयावर प्रदर्शन उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॅा.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते झाले.         कुलगुरु डॅा.सुभाष चौधरी, प्र.कुलगुरु डॅा.संजय दुधे, अधिष्ठाता डॅा.राजू हिवसे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॅा.प्रिती त्रिवेदी आदी यावेळी उपस्थित होते. भारतीय विज्ञान काँग्रसच्या निमित्ताने हे प्रदर्शन लावण्यात आले आहे. डॅा.सिंह यांनी त्याचे फित कापून उद्घाटन केले.         विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच देशाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव, देशातील तसेच विशेषत: विदर्भातील पुरातत्व उत्खनन आणि वास्तुकला वारसा दर्शविणाऱ्या या प्रदर्शनाची राज्यमंत्री डॅा.सिंह यांनी पाहणी केली. या ठिकाणी लावण्यात आलेल्या चित्रांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॅा.त्रिवेदी यांनी विषद केले. विभागाच्या प्राचीन वस्तू संग्रहालयाची देखील त्यांनी पाहणी केली.         तक्षशिला, हडपसर, ब्रम्हगिरी, कालीगंगा येथील उत्खननासह नागपूर जिल्ह्यातील अडम व मनसर तर भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील उत्खनन व तेथे आढळून आलेल्या वस्तूंची चित्रे या प्रदर्शनात आहेत. मानवाची उत्पत्ती, प्राचीन काळातील अवजारे, सातपुडा पर्वतातील गाविलगडच्या डोंगरांमधील कोरीव काम, नागपूर शहरातील वास्तूशास्त्रीय वारसा स्थळे, गोंडकालिन किल्ल्यांची चित्रे व माहिती या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त म.न.पा. व्दारा विनम्र अभिवादन

Wed Jan 4 , 2023
नागपूर : अज्ञानतेचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या १९2 व्या जयंती निमित्त मनपा केन्द्रीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी उपायुक्त निर्भय जैन, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहाय्यक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, निगम सचिव डॉ. रंजना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com