महाराष्ट्र दिनी ‘आपला दवाखाना’ चे वाडीत उदघाटन !

मुख्यमंत्रांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन.

वाडी :- 1मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा तर्फे राज्यभरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक ‘आपला दवाखाना’चे उदघाटन सकाळी10. 30 वा. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे उदघाटन होणार आहे.

राज्यभरातील अनेक सार्वजनिक दवाखान्या सह वाडी परिसरात मंजूर करण्यात आलेल्या आपला दवाखान्याचे उदघाटन .वाडी येथील शिवशक्ती नगरात करण्यात आला. दवाखान्याच्या उदघाटन कार्यक्रमा प्रसंगी क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा,डॉ. दिपक शेलोकर,राजनंदनी भागवत,डॉ. विवेक सक्सेना, उपविभागीय अधिकारी मनोहर पोटे,वाडी नप. चे मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांचे सह जिप. सदस्या ममता धोपटे,जि प. सदस्या भारती पाटील,पं.स.सभापती रुपाली मनोहर,उपसभापती अविनाश पारधी, रेखा वरठी, प्रीती अखंड ई. सह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. वाडी येथे शासना तर्फे ४’आपला दवाखाना’सुरू होत असल्याने नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे याचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड चे आरोग्य अधिकारी यांनी केले आहे

.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रब्बी पणन हंगाम 2022-23 साठी ऑनलाईन नोंदणी करीता मुदतवाढ

Wed May 3 , 2023
गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी महामंडळ मर्यादित नाशिक, उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) अंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार आधारभुत किंमत खरेदी योजना रब्बी पणन हंगाम 2022-23 मध्ये शासन निर्णयानुसार धान विक्रीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन नोंदणी करिता दि. 15 मे 2023 पर्यंत मुदतवाढ दिलेली असुन ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नाही. अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणेसाठी स्वत: सातबारा व इतर आवश्यक दस्ताएवजासह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com