नरखेड :- केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या अनुषंगाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वूमीवर आज नरखेड नगर परिषद येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ झाला.
केंद्र शासनाचा हा अतिशय महत्वाकांक्षी आणि जनहिताचा असा हा उपक्रम आहे. आतापर्यंत लाभ न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे, विविध योजनांची जनजागृती, लाभार्थ्यांशी संवाद, त्यांचे अनुभव आणि पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ देणे, हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे.यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उकेश चव्हाण , न.प मुख्याधिकारी शशिकांत गवई, शामराव बारई, संजय कामडे, नरखेड भाजप अध्यक्ष राजेश क्षिरसागर, प्रशासकीय अधिकारी योगेश कुरेकर, राहुल चव्हाण, माजी नगरसेविका वंदना बेहरे, गौरव गुरुमुळे, रामदास मेटांगळे तसेच इतर पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला नरखेड शहरातील नागरिक मोठ्या संखयेने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी नगरपरिषद कर्मचऱ्यांनी सहकार्य केले व यशस्वी घडून आणला.