नागपूर – प्रभाग क्र.१३, एन. आय. टी. गार्डन डागा ले-आऊट येथे नगरसेविका डॉ. परिणीता परिणय फुके यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाचे (STP) आज उद्घाटन नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी जी व आमदार डॉ परिणयजी फुके यांच्या हस्ते करण्यात आले.
नागपुर शहरात १२ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) नागपूर महानगर पालिकेद्वारे मंजूर करण्यात आलेले आहे. नगरसेविका डॉ.परिणीता फुके यांनी अथक प्रयत्न व सतत पाठपुरावा करत प्रभाग क्र.१३ येथील डागा लेआउट येथील नाल्यावर एसटीपी प्लांट मंजूर करण्यात आला. डागा लेआऊट येथील नाल्यामुळे अशुद्ध व घानेरडे पाण्यामुळे परिसरतील नागरिकांना याचा बराच त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात येथील नागरिकांकडून वारंवार एसटीपी प्लांट मंजूर करण्याची विनंती नगरसेविका डॉ.फुके यांना केलेली होती.

या वेळी , रामधाम तीर्थ आणि पर्यटक मित्राचे संस्थापक चंद्रपाल चौकसे,राईट वाटर इंडिया प्रा.लि चे संचालक अभिजीत गान,अभय देशपांडे,राहुल खराबे, नगरसेवक अमर बागडे,श्री. अरुण लोकरे,अॅड.अमीत बालपांडे,नितीन गुप्ते, योगेश पाली,अरुण कोल्हे,महेंद्र चांडक,श्याम जाधव,संदिप कोल्हे, संजय देशमुख,सुरेश व्यवहारे, किरण जाधव,बाल्याभाऊ मांगलकर,सुभाष तुपोने,बांद्रे मॅडम, सचिन बागवानी व परिसरातील इतर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.