सार्वजनीक स्वच्छतेच्या दृष्टीने मनपामार्फत दंडात्मक कारवाई , उपद्रव शोध पथक गठीत

उपद्रव प्रकारांसाठी दंडाची रक्कम जाहीर

सार्वजनीक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे मनपाचे आवाहन

चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ नुसार सार्वजनीक स्वच्छतेच्या दृष्टीने राजकला टॉकीज परिसरातील गेम पार्लर्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन साई व्हिडीओ गेम्स,अथर्व गेम पार्लर, राजवीर गेम पार्लर, येवले अमृततुल्य चहा या दुकानांवर रस्त्यावर थुंकणे, कचरा रस्त्यावर टाकणे इत्यादींसाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. फिरोझखान पठाण या व्यक्तीस रस्त्यावर मंडप टाकल्याप्रकरणी व इतर नागरीकांना सार्वजनीक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी तर इतर दुकानदारांना दुकानासमोर डस्ट बिन न ठेवल्याने दंड ठोठावण्यात आला आहे.

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले तसेच इतर सर्व व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनेवर कचरापेटी ठेवणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास आणि आस्थापनेच्या १० चौरसफूट परिसरात अस्वच्छता आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने दिला आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत ” उपद्रव शोध पथक ” ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे शहरातील सार्वजनीक स्वच्छता अबाधित ठेवणे, घनकचरा व्यवस्थापन नियमाची अंमलबजावणी करणे, उपद्रव थांबविणे, प्लास्टीक कचरा नियम अंमलबजावणी व नागरीकांमध्ये स्वच्छता ठेवण्याच्या कृतीमध्ये व्यावहारीक बदल घडविणे व दंडात्मक कारवाई करणे इत्यादी कारवाई केली जाणार आहे.

यासंदर्भात स्वच्छता विभागाद्वारे सूचना जारी केली जात असुन दंडाची रक्कमही नमूद केली आहे. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या निर्देशांनुसार, शहर स्वच्छतेच्या बाबतीतल्या नियमांची आता कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेतील भाग एक व ‘अ’ अंतर्गत पहिल्या प्रसंगाकरिता व त्यानंतरच्या प्रत्येक प्रसंगाकरिता दंड वसूल करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांकडून दंडाची मोठी रक्कम आकारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले आणि इतर सर्व व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनेत कचरापेटी ठेवण्याचे आवाहन स्वच्छता विभागप्रमुख डॉ. अमोल शेळके यांनी केले आहे.

स्वच्छता विभागाच्या पत्रकानुसार उपद्रव प्रकार व आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम 

सार्वजनीक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकल्यास – २०० रुपये दंड, सार्वजनीक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी / उघड्यावर मलमुत्र विसर्जन – ५०० रुपये दंड, हातगाड्या, स्टाल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता – ४०० रुपये, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे – १०० रुपये, दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकल्यास ४०० रुपये,शैक्षणीक संस्था, कोचिंग क्लासेस अशा संस्थांनी रस्ता फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी – १००० रुपये, दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब, इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकल्यास – ५०० रुपये, मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कटरर्स सर्विसेस, प्रोव्हाईडर इत्यादींना रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे – २००० रुपये, वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करून अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे – ५०० रुपये, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे, वाहने धुवून परीसर अस्वच्छ करणे – १००० रुपये, सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे – ५०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे – ५००० रुपये,

हरित लवाद यांनी दिलेल्या ०३.०७.२०१७ च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व लॉन यावर कार्यवाही करणे – ५००० रुपये, वर्कशॉप, गॅरेज व इतर दुरुस्तीचे व्यवसायिकाने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे – ५०० रुपये, उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास – २०० रुपये, उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास – १००० रुपये, प्लास्टिक कचरा – ५०० रुपये, प्लास्टिक वापर विक्री वाहतूक प्रथम वेळ – ५००० रुपये, प्लास्टिक वापर विक्री वाहतूक द्वितीय वेळ – १०००० रुपये,

प्लास्टिक वापर विक्री वाहतूक तृतीय वेळ – २५००० रुपये, कचरा दानी न ठेवणे (Dust Bin) २०० रुपये, अ) विलगीकरण न केलेला व वेगळ्या डब्यामध्ये साठवण न केलेला कचरा सोपविल्याबाबत – १) घरातून / व्यवसायिक आस्थापना पहिला प्रसंग २०० रुपये, नंतरच्या प्रत्येक प्रसंगी ३०० रुपये, २) मोठ्या प्रमाणावरील कचरा निर्माण करणारे जनक – पहिला प्रसंग ३००० रुपये, नंतरच्या प्रत्येक प्रसंगी ९००० रुपये, कचरा जाळण्याबद्दल ५००० रुपये, सार्वजनिक सभा / समारंभ संपल्यावर चार तासांच्या आत स्वच्छता न केल्याबद्दल १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एमआईएमआयएम कामठी नागपुर जिला ग्रामीण की ओर से मुफ़्त शिबिर का सफल आयोजन

Tue Jan 17 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी:- आल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन कामठी की ओर से हर वर्ष मुफ़्त आंखों की जांच,मोतियाबिन्द आप्रेशन,आंखों का तिरछापन आप्रेशन का आयोजन किया जाता है इस वर्ष भी पार्टी की ओर से शहर की एमएम रब्बानी हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज में आंखों की जांच के साथ साथ त्वचा रोग और सामान्य रोगों की जांच का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com