बाबुपेठ येथील मनपा शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी-जिल्हाधिकारी, महापौर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती

चंद्रपूर, ता. ३ : महानगरपालिकेच्या बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका ज्योती गेडाम, नगरसेविका कल्पना बगुळकर, सहायक आयुक्त विद्या पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपाचे शिक्षण अधिकारी नागेश नीत यांनी केले. पाच वर्षांपूर्वी या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या केवळ 70 होती. मात्र महानगरपालिकेने माडेल स्कूल म्हणून विकसित केल्यानंतर आज शाळेत 970 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशी माहिती नागेश नित यांनी दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वराज्य जननी जिजामाता यांच्या प्रतिमेला दीपप्रज्ज्वलन करून अभिवादन करण्यात आले. 2022 या वर्षानिमित्त मनपा शाळेने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा देखील मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी महापौर राखी कंचरलावार आणि जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सुदृढ आरोग्यासाठी सर्व मुलांचे लसीकरण व्हावे

Mon Jan 3 , 2022
-जिल्हाधिकारी अजय गुल्हाने गुल्हाने यांचे प्रतिपादन -बाबुपेठ येथे जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण मोहिमेचा शुभारंभ चंद्रपूर, ता. ३ : मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी शहरातील सर्व १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.   जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सोमवार, दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले मनपा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com