संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- अधिक मास व श्रावण महिन्यात शिव महापुराण कथेचे मनुष्याने श्रवण केल्याने यशाच्या मार्ग प्राप्त होऊन सर्वांगीण कल्याण होत असल्याचे मत वृंदावन येथील पंडित पंकजकृष्ण महाराज यांनी प्रगती नगर रनाळा येथे आयोजित शिवमहापुराण कथेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले. शिव महापुराण कथेची सुरुवात यशवंत कुल्लरकर व सविता कुल्लरकर यांचे हस्ते भगवान शंकर, पार्वती, गणेश मूर्तीची पूजा आरती आराधना करून करण्यात आले. पंडित पंकजकृष्ण महाराज प्रतिदिन दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत शिवमहापुराण कथेअंतर्गत भगवान शंकर पार्वतीच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन करीत आहेत. 18 ऑगस्ट शुक्रवारला हवन पूर्णआवर्ती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहेत त्याचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेण्याची विनंती चेतन कुल्लरकर,रोहन कुलरकर रनाळा ग्रामपंचायतचे सरपंच पंकज साबळे व शिव महापुराण कथा आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.