संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर मतदार यादी दुरुस्ती करून अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.यामध्ये मागील 9 महिन्यात कामठी विधानसभा मतदार संघातील 2 हजार 869 मतदारांच्या नावावर कात्री लावण्यात आली आहे तर 4 हजार 941 नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आले तसेच प्रारूप मतदार यादी ही 30 सप्टेंबर ला प्रसिद्ध केली जाणार आहे.
आगामी निवडणुकांच्या पाश्वरभूमीवर आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम लावण्यात आला आहे त्यामुळे निवडणूक विभागाकडून मतदारसंघनिहाय यादी दुरुस्ती, नावे समाविष्ट करणे आदी विविध प्रकारची सुधारणा करून अपडेट मतदार यादी तयार केली जाणार आहे.ही प्रारूप मतदार यादी 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
आतापर्यंत कामठी विधानसभा च्या मतदार यादीतून मृत पावलेले तसेच स्थलांतरीत झालेले 2 हजार 869 मतदार वगळण्यात आले आहे. याची अपडेट यादी तयार करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे.5 जानेवारी रोजी सादर केलेल्या मतदार यादीतील 2 हजार 869 मतदार वगळण्यात आले. त्यानूसार सद्यस्थितीत 2 लक्ष 28 हजार 638 मतदार आहेत .या मतदार यादीची अंतिम आकडेवारी 25 सप्टेंबर पूर्वी पूर्ण केल्यानंतर 30 सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत या यादीवर आक्षेप व हरकती स्वीकारल्या जाणार आहे त्यानंतर 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.