सावनेर – नागपुर जिल्ह्यातील सावनेर शहरात आज बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.. तसेच बैलांची पूजा करून बैलपोळा सण साजरा केला .
शेतात सोने उगविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा पोळा सण.. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण अर्थात पोळा दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यांत्रिकीकरणामुळे शेतीमधलं बैलांच महत्व कमी झालंय तरीही अनेक शेतक-यांना मशागतीसाठी आजही बैलांवरच अवलंबून राहवं लागतं. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणा-या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा..