संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6: स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना तुकडीच्या संयुक्त विद्यमानाने जाणाता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात हे प्रतिपादित केले. कार्यक्रमाचे समन्वयक व मुख्य वक्ता इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन जिवंत करतांना त्याची स्वराज्यास आवश्यकता व परिणामांची विस्तृत चर्चा करत विद्यार्थ्यांची जिज्ञासा शांत केली. याप्रसंगी इतिहास अभ्यास मंडळाचे सल्लागार डॉ. जयंत रामटेके, रजिस्ट्रार स्वप्नील राठोड, सी.डी.सी. सदस्य हेमंत शर्मा, उमेश बांगर सहित इतिहास आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना, सूत्रसंचालन व आभाराची धुरा राष्ट्रीय सेवा योजना आणि कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विनोद शेंडे यांनी सांभाळली.
पोरवाल महाविद्यालयात शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com