नागपूरमध्ये एरो मोडेलिंग शो चे आयोजन ; क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिली माहिती

नागपूर दि, २२ :राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच नागपूर येथे एरो मॉडेलिंग शो चे आयोजन करण्यात आले असून या शोमुळे विद्यार्थ्यांना या शोचा थरार थेट पाहायला मिळणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

मुंबई येथे मंत्रालयात एरो मॉडेलिंग शो विषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस क्रीडा विभागाचे आयुक्त प्रकाश बकोरिया हे दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.तर कर्नल अमित बाली ,ब्रिगेडीअर लाहीरी, कँप्टन सतपाल सिंग यांची उपस्थिती होती.

मंत्री  सुनील केदार म्हणाले ,आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत नागपूर शहरातील मोठ्या मैदानात हाजरों विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या आकाराचे विमाने(मानव विरहीत) उडविण्यात येणार आहेत. हा शो पाहण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून विद्यार्थी येणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शोचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. हा शो क्रीडा विभाग, एनसीसी आणि सैन्य दल यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. विद्यार्थ्यांना एरो माँडलिंग विषयी माहिती होऊन त्याबद्दलचे आकर्षण त्यांच्यामध्ये निर्माण होईल.अशा उपक्रमामुळे सैन्यदलाविषयी, विद्यार्थी माहिती मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची संप मागे घेण्याची तयारी

Tue Feb 22 , 2022
– कर्मचारी संघटनेतील सहकारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संप मागे घेण्याबाबत उद्या घोषणा करण्याची कर्मचारी नेत्यांची माहिती – राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या रास्त, न्याय्य, व्यवहार्य मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्याची ग्वाही मुंबई, दि. 22 :- कर्मचाऱ्यांच्या हक्काचा विचार करताना राज्यंही चालले पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्याच्या हिताचा विचार करुन उद्यापासूनचा प्रस्तावित संप मागे घ्यावा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून उपमुख्यमंत्र्यांनी केलेली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com