नागपुरात 11 तर रामटेक लोकसभा करिता 6 उमेदवाराकडून अर्ज दाखल

▪️ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

नागपूर :- नागपूर सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज 11 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण 19 अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), संतोष चव्हाण (अपक्ष), बबिता अवस्थी (अपक्ष), विनायक अवचट (अपक्ष), श्रीधर साळवे (भीम सेना), सचिन वाघाडे (अपक्ष), ॲड. पंकज शंभरकर (अपक्ष), विशेष फुटाणे (बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी) आणि आदर्श ठाकूर (अपक्ष), किवीनसुका सुर्यवंशी (देश जनहित पार्टी) यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. तर विकास ठाकरे (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूरसाठी आज 75 अर्जांची तर आतापर्यंत एकूण 347 अर्जांची उचल करण्यात आली.

*रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज सहा अर्ज दाखल*

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज 6 अर्ज स्वीकारण्यात आले. रामटेकसाठी एकूण दाखल अर्जांची संख्या 7 झाली आहे.

रामटेकसाठी गोवर्धन सोमदेवे (अपक्ष), ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), उमेश खडसे (राष्ट्र समर्पण पार्टी), शंकर चहांदे (वंचित बहुजन आघाडी), संदीप गायकवाड (अपक्ष), आशिष सरोदे (भीमसेना) यांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण 7 अर्ज दाखल करण्यात आले रामटेकसाठी आज 42 अर्जांची उचल करण्यात आली. आतापर्यंत रामटेकसाठी एकूण 205 अर्जांची उचल करण्यात आली.

नामनिर्देशनपत्रे 27 मार्चपर्यंत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. 28 मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खोटे कागदपत्र तयार करून कार विक्री प्रकारणात फसवणूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Tue Mar 26 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील फिटनेस जिम मध्ये झालेल्या कार खरेदी करण्याचा शाब्दिक व्यवहारातून आरोपीने खोटे कागदपत्र तयार करून कार विक्री चा 2 लक्ष 60 हजार रुपयात सौदा करून फिर्यादीने आरोपीस 1 लक्ष 75 हजार रुपये नगदी दिले मात्र ही कार नागपूर च्या बांगलादेश येथील मनिष भैसारे कडे 90 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com