संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात गणरायाचे विसर्जन
कामठी :- दहा दिवसीय गणेशोत्सवाच्या अनंत चतुर्दशी पर्वावर गणरायाचे कामठी तालुक्यात ठिकठिकानी गणपती बाप्पा मोरया ….पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात थाटात विसर्जन करण्यात आले.
मंगलमय वातारणात श्री गणेशाचे भक्ती भावाने भजन,पूजन, आराधना, व आदरातिथ्य केल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देत महादेव घाट येथे विसर्जन करण्यात आले. विसर्जन दिवशी नदीत पाण्याचा जलस्तर वाढत प्रवाह वाढल्याने नदीला चांगलाच पूर आला होता यावेळी विसर्जन दरम्यान कुठलीही अनुचीत घटना न घडावी यासाठी प्रशासनाच्या पूर्वनियोजित नुसार ढिवर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विसर्जन सोय करण्यात आल्याने गणरायाचे सोयीस्कर विसर्जन करण्यात आले तसेच नदी प्रदूषित होणार नाही याची दक्षता घेत लायन्स क्लब कामठी च्या वतीने निर्माल्य व्यवस्थापन साठी महादेव घाटावर ठिकठिकानी निर्माल्य साधने व निर्माल्य संकलन कुंडी ठेवल्याने नागरिकांनी निर्माल्य तिथे संकलित करीत त्वरित स्वच्छता करण्यात आली. तसेच विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळाच्या स्वागतासाठी जुनी कामठी पोलीस स्टेशन समोर नेतेमंडळी नि मोठं मोठे स्वागत मंच तयार केले होते यानुसार भाजप,कांग्रेस,शिवसेना अशा विविध पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले गणेश विसर्जन तसेच मिरवणूक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडावे यासाठी पोलीस निरीक्षक दीपक भिताडे , पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यानि ठिकठिकानी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवीत प्रत्येक हालचालीवर पोलिसांनी नोयंत्रण साधले होते.
कामठी चा राजाचे थाटात विसर्जन
श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी येथील शैक्षणिक परिसरात विराजमान कामठी चा राजा चे थाटात मिरवणूक काढून महादेव घाट कॅन्ट कामठी येथे विसर्जन करण्यात आले.
संस्थेचे सचिव सुरेश भोयर, उपाध्यक्षा अनुराधा भोयर, कार्यकारी संचालक अनुराग भोयर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर त्याचप्रमाणे संस्थेद्वारा संचालित सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.