संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पहिली पायरी समजली जाणारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ ला घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेमध्ये कामठी तालुक्याचा निकाल ९०.६१ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत ८ टक्यांनी निकाल कमी आहे. तालुक्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याने मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. तालुक्यातील १५ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
कामठी तालुक्यातील ४९ शाळांमधून १२६६ मुले व १३३३ मुली असे एकूण २५९९ विघार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी १०९१ मुले (८६.१७) व १२५३ मुली(९३.९९) एकूण २३४४ विघार्थी (९०.१८) उत्तीर्ण झाले. या परिक्षेमध्ये तालुक्यातील ५४६ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, ८१५ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर ८०७ विद्यार्थी द्धितीय श्रेणीत तर २८३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
तालुक्यातील कामठीच्या सेठ रामनाथ लोईया हायस्कुल कामठी, रामकृष्ण शारदा मिशन माध्यमिक स्कूल, भांगे पब्लिक स्कूल पांजरा, प्रियांती इंग्लिष स्कुल तरोडी (बु), गुरूकुल पब्लिक स्कुल वडोदा, राजीव विद्यालय जाखेगाव, मास्टर नूर मोहम्मद, अनुसूचित जाती नवबौध्द मुलांची शासकीय शाळा वारेगाव, इंडियन आॅलंपियाड स्कुल भिलगाव, आयडियल कॉन्व्हेन्ट गुमथळा, एम एन एम ब्राईट इंग्लिश स्कूल येरखेडा, तायवाडे पब्लिक स्कूल कोराडी, भोसला मिलीटरी स्कुल पंचवटी, सनराईज कॉन्व्हेन्ट स्कूल महादुला, टर्निंग पॉईंट पब्लिक स्कूल खेडी या १५ शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून मागील वर्षी ३१ शाळांनी शंभरी गाठली होती. तर तालुक्यातील कामठीच्या हाजीयानी खतीजाबाई गर्ल्स हायस्कुल (९८.५५), सेंट जोसेफ काॅन्हवेंट हायस्कुल (९४.५८), सरस्वती शिशु मंदीर (९०.३८), रामकृष्ण शारदा मिशन स्कूल ऑफ होम सायन्स (९८.८८), शिक्षक सहकारी माध्यमिक शाळा(५१.७२), नूतन सरस्वती गर्ल्स हायस्कूल (८०.६०), एम.एम. रब्बानी हायस्कूल (९६.८१), नूतन सरस्वती बाॅईज हायस्कुल (७४.८२), सेठ कल्लनमियाॅ अंसारी हायस्कुल (७०.९६), इंदिरा हायस्कुल (३०), देशभक्त रत्नप्पा कुंभार विद्यालय (७८.१८), अविनाश हायस्कूल (२८.५७), हरदास हायस्कुल (६२.५०), प्रागतिक माध्य.विद्यालय कोराडी (९९.२०), तेजस्विनी माध्यमिक विद्यालय (९८.८५), विद्या मंदीर हायस्कूल कोराडी (९८.५६), सेवानंद विद्यालय महादुला (९०), आदर्ष विद्यालय गुमथळा (गुमथी) (९०), अष्विनी माध्यमिक विद्यालय बिना (८५), पद्मश्री स्मिता पाटील कन्या विद्यालय महादुला(९१.१७), विवेकानंद विद्यालय पळसाड (९७.२९), टेमसना माध्यमिक विद्यालय टेमसना (९३.०२), स्वं. राजीव गांधी हायस्कुल सुरादेवी (७५), पांडुरंग गवते विद्यालय भिलगाव(८४.८४), अॅड. दादासाहेब कुंभारे माध्यमिक विद्यालय खसाळा (७३.६८), ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय पावनगाव (५६.६६), अॅड. दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी (७३.६८), प्रकाश हायस्कुल गुमथळा (९४.९३), गांधी विद्यालय वडोदा (७९.०३), श्रीनाथ विद्यालय महालगाव (७८.४३), स्नेही विकास विद्यालय भुगाव (८३.०५) असा निकाल आहे.