मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संविधान दिनानिमित्त भारतीय राज्य घटनेचे अभ्यासक तसेच निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे माहितीपर व्याख्यान शनिवार, दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
फेसबुक- https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर- https://twitter.com/MahaDGIPR
भारतीय संविधानाचे वेगळेपण, देशभरात साजरा केला जात असलेला संविधान दिन, संविधानातील मुलभूत अधिकारांचे वर्णन, संविधानातील मुलभूत कर्तव्यांचा समावेश तसेच संविधानाची वैशिष्ट्ये, भारतीय राज्य घटनेची उद्देशिका याबाबतची सविस्तर माहिती खोब्रागडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.