संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 18 ते 20 लाख रुपयाचे नुकसान, सुदैवाने प्राणहानीटळली
कामठी :- कामठी ,तालुक्यातील भुगाव येथे काल सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने चार घरे जळून खाक झाली असून चारही घरमालकाचे 18 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहेत. सुदैवाने आगीत प्राणहानी टळली.
प्राप्त माहितीनुसार ज्ञानेश्वर हरिभाऊ आंबीलदुके वय 53 वर्षे हे एसटी महामंडल नागपूर येथे चालक म्हणून कार्यरत असून ते ड्युटीवर होते पत्नी उषा आंबीलदुके ह्या घरी असताना सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने घरात आगीचा भडका उडाला त्यामुळे सर्वत्र आग पसरली. उषा घराच्या बाहेर निघून आरडाओरड करू लागली गावातील बरेच नागरिक शेतात कामाला गेल्याने काही नागरिक गोळा झाले परंतु आगीने रुद्ररूप धारण केल्याने बाजूचे तीन घरे आगीच्या भडक्यात आल्याने तेही जळून नागरिकांच्या अंगावरील कपडे उरले बाकी घरातील जीवनाशक,अन्य, धान्य ,वस्तू ,भांडीकुंडी, कपाटातील दागिने व पैसे सुद्धा जळून खाक झाले ज्ञानेश्वर यांच्या घरात कपाटात नगदी 85 हजार रुपये व सोन्या-चांदीचे दागिने असे मिळून सहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहेत त्यांच्याच घराच्या बाजूला विधवा उषा रमेश आंबीलडोके वय 37 वर्ष यांच्याही घराला आग लागल्याने त्यांच्या घरातील अंगावरचे कपडे सोडून सर्व वस्तू जळून खाक झाल्याने त्यांचे तीन लाख रुपयांच्या वर नुकसान झाले आहेत त्यांच्या शेजारी घराला लागूनच विधवा महिला ओमलता चंद्रकांत आंबिलदुके वय 45 वर्ष यांचेही घराला आग लागल्याने त्यांचेही घर संपूर्ण जळून खाक झाले त्यांच्याही घरातील अंगावरील कपडे उरले बाकी सर्व जळून खाक झाले आहेत.
त्यामुळे त्यांच्याही तीन लाख रुपयाचे वर नुकसान झाले आहेत त्यांच्याच घराला लागून असलेले रामकृष्ण रमेश आंबीलडोके यांचे संपूर्ण घर जळाल्याने घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू ,अन्नधान्य, फर्निचर साहित्य, भांडीकुंडी सर्व जळाल्याने त्यांचेही सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे शेवटी अंगावर असलेले कपडे उरले आहेत आग लागल्याची माहिती गावात पसरताच संपूर्ण गावकरी धावून आले व घटनेची माहिती मौदा पोलीस स्टेशनला दिली असता ठाणेदार सतीशसिंग राजपूत यांनी त्वरित दखल घेत एनटीपीसी , मौदा नगरपंचायत व हल्दीराम कंपनी गुंमथाला यांच्या तीनही अग्निशामक गाड्या व ते स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले अग्निशामक दलाच्या गाड्या वेळेवर उपलब्ध झाल्याने पाण्याचा मारा झाल्याने आग आटोक्यात आली सुदैवाने घरात कोणीही व्यक्ती नसल्याने प्राणहानी टळली आगीने चारही घरमालकाचे 18 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे गावातील ग्रामपंचायत सदस्य जितू मेहरकुंडे यांनी लगेच कामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे यांना माहिती दिली काही महसूल अधिकारी घटनास्थळी हजर झाले असल्याचे सांगण्यात आले चारही नागरिकांचे घर जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत पोलीस प्रशासन व महसूल अधिकाऱ्याकडून पंचनामा करण्यात येत आहे गावातील नागरिकांनी चारही गरीबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना शासनाच्या वतीने त्वरित आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.