केंद्र आणि राज्य शासनाद्वारे महिला विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– शालेय विद्यार्थीनींना सायकल आणि स्कुल किटचे वितरण

नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला विकसित बनविण्याचे उद्दिष्टय पूर्ण करण्यासाठी देशातील 50 टक्के महिलांना मानवसंसाधन क्षेत्रात प्रशिक्षित करण्याचा संदेश दिला आहे. याच दिशेने केंद्र आणि राज्य सरकार महिला विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत असल्याचे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

जागतिक महिला दिनाच्या औचीत्याने जुना सुभेदार लेआऊट परिसरातील नागपूर महानगर पालिकेच्या दुर्गानगर हायस्कुलमध्ये आरबीएल बँकेच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यार्थीनींना सायकल आणि स्कुल किटचे वितरण करण्यात आले.

या समारंभात फडणवीस बोलत होते. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, आरबीएल बँकेच्या सीएसआयआर फंड विभागाचे प्रमुख बालीकृष्ण नटराजन आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, जागतिक महिला दिन म्हणजे समाजातील शक्तीस्वरूप घटकासाठी संकल्पबद्ध होण्याचा शुभ दिन होय. देशाच्या पंतप्रधानांनी विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी विविध क्षेत्रात महिलांच्या सहभागावर भर दिला आहे. तसेच, महिलांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.

शासनासोबतच खाजगी क्षेत्रानेही या कामात आघाडी घेतली आहे. आरबीएल बँकेने मनपाच्या समन्वयाने व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीतून (सिएसआयआर फंड) मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल व स्कुल किट देण्याचा सुरु केलेला उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाद्वारे मुलींना शाळेत येण्यासाठी अडचण दूर होवून त्यांचा मार्ग सुकर होणार असल्याचा विश्वासही  फडणवीस यांनी व्यक्त केला.

बालीकृष्ण नटराजन यांनी प्रास्ताविक केले तर साधना सयाम यांनी आभार मानले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रेहमाली फातिमा, अश्मल सतफ, आरोही चिपेल आणि माही बोडगे या विद्यार्थीनींना प्रातिनिधीकरित्या सायकल व स्कुलकिटचे वितरण करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘शिवजागर’द्वारे २०० कलाकार मांडणार छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास!

Sat Mar 9 , 2024
– महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नवी दिल्लीत ‘शिवजागर’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त दिल्लीतील शिवप्रेमींसाठी मोठी पर्वणी नवी दिल्ली :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नवी दिल्ली येथे ‘शिवजागर : साद सह्याद्रीची’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजता सिरी फोर्ट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com