5 व्या दिवशी 2942 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थान विभागातर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.

डॉ. गजेन्द्र महल्ले, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी सांगितले की, पांचव्या दिवशी 2942 श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन विविध ठिकाणी करण्यात आले. यामध्ये पीओपीची मूर्ती फक्त 69 होती आणि मातीच्या मूर्ती 2873 होती. नागरिकांनी मोठया संख्येत मातीच्या श्रीगणेश मूर्तीची स्थापना यावेळेस केली आहे. त्यांनी सांगितले की, ग्रीन व्हीजील फाउंडेशन तर्फे फुटाळा तलावात श्रीगणेश विसर्जन मध्ये मनपाला सहकार्य प्राप्त होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

३७२५ मूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन

Thu Sep 12 , 2024
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या २५ कृत्रिम कुंड व ३ फिरत्या विसर्जन कुंडात एकुण ३७२५ मूर्तींचे विसर्जन बुधवार १२ सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे. शहरात दीड दिवस,दोन दिवस,पाच दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने त्या त्या दिवशी विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवण्याची गरज भासते. उत्‍सवादरम्‍यान होणारी गर्दी टाळण्‍याकरिता महापालिका प्रशासनातर्फे घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com