संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-डी आर एम साऊथ ईस्टर्न सेंटर रेल्वेच्या कार्यालयातील बैठकीत मागणी
कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखोंच्या संख्येत अनुयायी विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देत असतात. यावर्षी बसेस व चार चाकी वाहनांनी प्रवास करणाऱ्या अनुयायी करिता ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला पोहोचण्याकरिता रमा नगर मार्गावरील रेल्वे उडान पुलाचे काम अजूनही पूर्णत्वास आले नाही अशा परिस्थितीत आजनी मार्ग जवळील नवनिर्मित रेल्वे अंडरपास ब्रिज हा एकमात्र पर्याय आहे.त्यामुळे रेल्वे अंडरपास ब्रिजचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी माजी राज्यमंत्री व ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख ऍड सुलेखा कुंभारे यांनी डी आर एम साऊथ ईस्टर्न सेंटर रेल्वे कार्यालयात बैठकी दरम्यान केली.
साऊथ इस्टर्न सेंटर रेल्वेच्या डी आर एम नमिता त्रिपाठी यांनी पावसामुळे रेल्वे अंडरपास ब्रिज चे काम रखडलेले आहे.व त्यामुळे रेल्वे अंडरपास ब्रिज चे काम पूर्ण होऊ शकले नाही असे मान्य केले व धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी काम पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन दिले. यासंदर्भात आपण केंद्रिय मंत्री ना नितीन गडकरी व रेल्वे मंत्री दानवे यांना सुद्धा निवेदनाच्या माध्यमातुन रेल्वे अंडरपास ब्रिजचे काम त्वरित पूर्ण करण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे ऍड सुलेखा कुंभारे यांनी दिली.