एसडीपीओ व डीबी पथक एपीआय आणि कर्म चा-याची त्वरित बदली करा – किशोर बेलसरे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण हयाना निवेदन देऊन केली मागणी. 

कन्हान :- लोकसभा निवडणुकीनंतर पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत शहर व गावात दिवसेदिवस चो-या, घरफोडया, लुटमार, हाणामारी च्या घटना वाढत असुन डीबी पथक वसुलीत मग्न असुन पोलीस सुस्त अस ल्याने कामठी-कन्हान उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, डीबी पथक सपोनि राहुल चव्हाण व कर्मचारी याची तातडीने बदली करून शांती सुव्य वस्था कायम करण्याची मागणी पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण हयाना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट नागपुर जिल्हा कार्याध्यक्ष किशोर बेलसरे हयानी निवेदन देऊन केली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान- कांद्री शहर व परिसरातील गावात दररोज चो-या, घरफोडया, दुकानफोडया, एटीएम फोडी, मारपीट, हाणामारी, लुटमारी सारख्या घटना दिवसेदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण होत असुन सुध्दा रात्रीला पोलीस गस्त होत नाही. तरी सुध्दा वरिष्ठाकडुन कुठ लिही कार्यवाही होताना दिसत नाही. डीबी पथक सपोनि व पोलीस कर्मचारी स्वत:ला पोलीस निरिक्षक समजुन मोठया प्रमाणात वसुली करित असुन त्याचे बरेच प्रकरण आहेत. कन्हान पोलीस स्टेशनच्या नवीन इमारती मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचे कार्यालय असुन सुध्दा कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत शांती सुव्यवस्था नांदत नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, डीबी पथक सपोनि राहुल चव्हाण व कर्मचारी याची तातडीने बदली करून शांती सुव्यवस्था कायम कर ण्याची मागणी  पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामिण हयाना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट नागपुर जिल्हा कार्याध्यक्ष किशोर बेलसरे हयानी निवेदन देऊन केली आहे. यावर कार्यवाई न झाल्यास आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागेल. असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वराडा जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक सप्ताह कार्यक्रम संपन्न 

Mon Jul 29 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील वराडा येथे जिल्हा परिषद शाळेत “शिक्षण सप्ताह” निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्राम पंचायत सरपंच सुनिल जामदार यांचे द्वारे विद्यार्थांना स्नेह भोजन करुन शैक्षणिक सप्ताह कार्यक्रमाची सांगता थाटात करण्यात आली. केंद्रशासन निर्देशानुसार संपुर्ण देशभरात दि. २२ ते २८ जुलै २०२४ या दरम्यान ” शिक्षण सप्ताह ” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com