अवैधरित्या अन्नधान्य साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कारवाई

मुंबई : अवैधरित्या अन्नधान्य साठवणूक करणारे गोदामचालक ओमप्रकाश यादव व टेम्पो चालक मोहिद्दीन शेख यांच्याविरूध्द नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कान्हुराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने कारवाई केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

            मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात अन्नधान्याचे वितरण सुरळीत होणे तसेच अन्नधान्य पुरवठा व वितरणामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याकरिता नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे मार्गदर्शनाखाली भरारी पथक गठित करण्यात आलेले आहे. या भरारी पथकामार्फत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत 14 जानेवारी 2022 रोजी अवैधरित्या अन्नधान्याची वाहतुक करणाऱ्या टेम्पो क्र. एम.एच.01-डीआर.1780 चा चालक मोहिद्दिन बाबू शेख याचे विरुध्द तुर्भे पोलीस ठाणे येथे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत गुन्हा (नोंद क्रमांक 11/2022) दाखल करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये 7,830 किलो गहू व टेम्पो असा एकुण  रुपये 13,66,430/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

            टेम्पोचालक मोहिद्दिन बाबू शेख याने दिलेल्या माहितीनुसार भरारी पथकाने जगताप कंपाऊड, सावित्रीबाई फुले शाळेच्या बाजूला असलेल्या कंपाऊडच्या आत पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे अन्नधान्याचा अवैध साठा आढळून आल्याने या ठिकाणी छापा टाकून एकुण 42 हजार 506 किलो गहू व 8 हजार 085 किलो तांदुळ असा एकुण रुपये 16 लाख 19 हजार 800/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोदाम चालक ओमप्रकाश यादव याचेवर नेहरु नगरपोलीस ठाणेकुर्ला येथे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत गुन्हा (नोंद क्रमांक 2/2022) दि. 15 जानवारी 2022 रोजी दाखल करण्यात आलेला आहे.

            या कारवाईमध्ये भरारी पथकातील शिधावाटप निरीक्षक सर्वश्री भगवान खंडेरावसुशिल साळसकरसंदिप चौधरीअमोल बुरटेतसेच स्थानिक शिधावाटप कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी विलास उदुगडे,विजय राठोडनागनाथ हंगरगेगजानन फालेराजेश सोरटेमंगेश राणेसंदिप साबळेबाळासाहेब कारंडे तसेच  तुर्भे पोलीस ठाणे व नेहरु नगर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

वैद्यकीय प्राणवायू प्रकल्पातून ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ची पुन्हा प्रचिती माहूल व महालक्ष्मी स्थित प्राणवायू सिलेंडर पुनर्भरण प्रकल्पांच्या लोकार्पणप्रसंगी पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांचे गौरवोद्गार

Tue Jan 18 , 2022
–    वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका  –   माहूल येथे प्रतिदिन १५ मेट्रिक टन प्राणवायू वापरुन १५०० जंबो सिलेंडर्स भरणे शक्य, –    भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्याने प्रकल्प उभारणी –    महालक्ष्मी प्रकल्पामध्ये प्रतिदिन १०० ते १२० ड्युरा सिलेंडर्स भरण्याची क्षमता –    स्वतःच्या प्रकल्पांमुळे सिलेंडर पुनर्भरणाच्या खर्चात होणार ४० टक्के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com