खापरखेड़ा – सावनेर तालुक्यातील चनकापुर येथे कन्हान नदीपात्रातून अवैध्यरीत्या रेतीचे उत्खनन करुण साठा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पुलिस यांनी धाड टाकली. यावेळी 60 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला आहे असुन अवैध रेती साठा करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन खापरखेडा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की मिलन चौक चनकपुर येथे अवैध रीतीने रेतीचा स्टॉक असून JCB द्वारे रेती टिप्पर मध्ये भरले जात आहे असे माहिती वरून नमूद ठिकाणी जाऊन रेड केला असता, JCB क्र MH 40 P 3375 नि टिप्पर क्र MH 40 BG 6388 मध्ये दोन इसम 1) संकेत सुरेश कोल्हे रा पारडी2) रिहान रिजवानं शेख रा दहेगाव रेती भरतांना मिळून आले. तसेच सदर ठिकाणी अंदाजे 60 ब्रास कि. 180000/- रुपयेचा रेती चा अवैद्य साठा मिळून आला. वरून सदर स्टॉक बाबत व दोन्ही वाहनावर दंडात्मक कारवाई करिता मा. तहसीलदार सावनेर यांना हस्तांतरित करण्यात आले. दोन्ही वाहने 1) JCB पिवळ्या रंगाचा किंमत 1000000/- ₹ 2) टिपर क MH 40 Y 6388 किमती 1200000/- 3) 4 ब्रास रेती किमती 12000/- असा एकूण 22,12000 /- किमतीचा.
सदर कार्यवाहीत :- स.पो.नी. अनिल राऊत पो.हवा. ज्ञानेश्वर राऊत पो.हवा. अरविंद भगत ,पोना शैलेश यादव वीरेंद्र नरड चा.पो. ASI साहेबराव बहाले यांनी पार पाडली.