– निवडणुकीच्या अनुषंगाने कारवाईची धडक मोहिम
यवतमाळ :- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसात तब्बल 10 लाख 48 हजाराचे अवैध मद्य जप्त करण्यात आले.
जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन दि. 8 ते 12 नोव्हेंबर रोजी गोपनिय माहितीच्या आधारे नांदेपेरा गावाचे शिवार, गोपालपुर, ता.पांढरकवडा, जिरामिरा ता.पांढरकवडा, मौजा धुंदी गावाचे शिवार नाल्याकाठी ता. पुसद, कळंब ते यवतमाळ हायवे रोड, राळेगांव परिसर, रूई वाई, भांबराजा, मटन मार्केट, पाटण बोरी, दामले फैल, वणी, विठोळी ता.दिग्रस जवळा शिवार, बोरगाव, आर्णी या परिसराच्या ठिकाणी एकुण 31 ठिकाणी धाडी टाकुण 31 वारस गुन्ह्यामध्ये 32 आरोपी व 8 वाहनासंह देशी मद्य 129.44 लिटर, हातभट्टी 860 लिटर, विदेशी मद्य 10 लिटर व ताडी 90, सडवा 7 हजार 936 लिटर असा एकुण 10 लाख 48 हजार 425 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारासंघातील मतदार प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये विभागामार्फत धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. निवडणुक काळामध्ये यामध्ये अधिक वाढ करण्यात आली असून अवैध दारू विक्रीवर विभागाची काटेकोर नजर आहे.
तसेच विधानसभा निवडणुक आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क कार्यालयांतर्गत दि.15 ऑक्टोबर ते दि. 12 नोव्हेंबर या कालावधीत एकुण 180 गुन्हे नोंदवुन 179 वारस गुन्ह्यासह 186 आरोपीसह 22 वाहनांसह देशी मद्य 642.73 लिटर, हातभट्टी 3822 लिटर, विदेशी मद्य 24.2 लिटर, ताडी 532 लिटर व सडवा 39911 लिटर असा एकूण 38 लाख 12 हजार 965 रूपयाचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एन. सेंगर, निरीक्षक पी. एस. बोढारे, पुसदचे निरीक्षक जी. एस. वाघ, पांढरकवडाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक साहेबराव बोदमवाड यांच्यासह सर्व दुय्यम निरीक्षक व जवान कर्मचारी यांनी सहभाग घेतला.