दोन ट्रक, एक पिकअप वाहन पकडुन ५३ लाख रू.चा मुद्देमाल जप्त. ४ आरोपी अटक.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस १३ किमी अंतरावर असलेल्या डुमरी शिवारात कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या गुप्त माहीती वरून पेट्रोल पंप च्या समोरील शेतात जाणाऱ्या रस्त्या जवळील नहराजवळ शेतात गाय व बैलांना चाऱ्या पाण्याची कोणतीही सोय न करता बांधुन ठेऊन दोन ट्रक, एक पिकअप वाहनात अवैध रित्या वाहतुक करण्या-या चार आरोपीना पकडुन त्याच्या ताब्यातील दोन ट्रक व एक पिकअप वाहनासह ५३ लाख रूपया चा मुद्देमाल कन्हान पोलीसांनी पकडुन ५७ बैल, १२ गाय, २३ गोरे असे ९२ गौवंश जनावरांना जीवनदान देऊन कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस सुत्राकडुन प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.२१) फेब्रुवारी ला रात्री ११:३० ते मंगळवार (दि. २२) फेब्रुवारी २०२२ ला दुपारी १२:३० वाजता दरम्या न कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे हे आपल्या कर्मचा-यासह सरकारी वाहनाने पो स्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीर द्वारे गुप्त माहीती मिळाल्याने नागपुर जबलपुर राष्ट्रीय महा मार्गावरील मौजा डुमरी शिवारात पेट्रोल पंप च्या समो रील बाजुने शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या जवळील नहरा जवळ एका शेतामध्ये गायी, बैलांना चाऱ्यापाण्याची कोणतीही सोय न करता बांधुन ठेवलेले असुन गायी व बैलांची वाहनाने अवैध रित्या वाहतुक करण्याकरिता घटनास्थळावर दोन ट्रक व एक पिकअप वाहन अस ल्याने कन्हान पोलीसांनी दोन पंचासह घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता टाटा कंपनीचा दहाचाकी ट्रक क्र. एम एच २८ बी ८६७१ मध्ये २१ बैलांना कोंबु न त्यांचे पाय व तोंड बांधुन चाऱ्यापाण्याची कोणतीही सोय न करता निर्दयतेने व क्रुरपणे कत्तलीकरिता ट्रक मध्ये भरलेले दिसुन आल्याने कन्हान पोलीसांनी गोवं श बाबत आरोपीस विचारणा केली असता आरोपींनी फिर्यादी सोबत शाब्दिक वाद करून हाताने ढकलुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने कन्हान पोलीसांनी घटनास्थळावर पंचनामा करून १) दहा चाकी ट्रक क्र एम एच २८ बी ८६७१ मध्ये २१ बैल क्रुरतेने कोबुन ठेवलेले ट्रक किंमत २० लाख रुपये, बैल प्रती १०,००० रुपये प्रमाणे २१ बैल किंमत २,१०,००० रुपये २) दहा चाकी ट्रक क्र. एम एच ४० सीबी २२०२ किंमत २० लाख रुपये ३) टाटा योद्धा पिकअप वाहन क्र. एम एच बी एल ६२२५ किंमत ५ लाख रुपये ४) दोरीने बांधलेले ३६ बैल प्रती बैल किंमत १०,००० रुपये प्रमाणे ३,६०,००० रुपये ५) दोरीने बांधलेल्या १२ गायी प्रति गाय १०,००० रुपये प्रमाणे १,२०,००० रुपये ६) दोरीने बांधलेले २३ गोरे प्रति गोरा किंमत ५,००० रुपये प्रमाणे १,१५,००० असा एकुण ५३,०५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून गौवंश जनावरे वाहनात भरून देवलापार व लाखणी येथील गौरक्षण मध्ये जनावरे दाखल करून ९२ गौवंश जनावरांना जिवनदान दिले. कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी शरद रविंन्द्र गिते वय ३४ वर्ष पोस्टे कन्हान यांच्या तोंडी तक्रारीवरून आरो पी १) मोहम्मद अनिस अब्दुल कुरैशी वय ३२ वर्ष राह कामठी, २) शेख सलमान शेख बशीर वय ३० वर्ष राह कामठी, ३) रशिद वल्द ब्रदुजमा बेग वय ३१ वर्ष राह नागपुर, ४) जेहुर महरूम साहीब खान वय ३१ वर्ष राह नागपुर अश्या चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा विरुद्ध अप क्र ७४/ २०२२ कलम ३५३, ३४ भादंवि सह कलम महा राष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ कलम ५ (अ)(१), ५ (ब)९ सह प्राणी छळ प्रती अधिनियम ११ (१)(ड), ५ अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमा र मंगर, अपर पोलीस अधिक्षक राहुल माखणीकर, उप विभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष क विलास काळे, उपनिरीक्षक महादेव सुरजुसे, राहुल रंगारी, शरद गिते, मंगेश सोनटक्के, नवीन पाटील, वैभव वरीपले सह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.