अवैध गोवंश वाहतूक करणारा वाहन पोलीसांच्या ताब्यात

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

गोवंश वाहतूक करनारा वाहनाचालक वाहन सोडुन फरार

गोंदिया :- जिल्ह्यातील देवरी – चिचगड महामार्गावरील मनोहर भाई पटेल शाळेसमोर रात्रीच्या सुमारास वाहन क्रमाकं MH 31 CN 2007 या वाहनात ऐकावर ऐक सहा जनावर कोबुंन ठेवत वाहन सोडुन वाहन चालक पसार झाल्याचे आज पहाटेच्या सुमारास त्या परिसरातील नगरीकांच्या निदर्शनात आले. त्या दुकानदारांनी तात्काळ याची माहीती देवरी पोलिसांना दिले असता पोलिसांनी सहाही जनावरानां त्या वाहनाच्या बाहेर काढत त्याच्यांवर डॉक्टराच्यां हस्ते उपचार सुरू केले आहे. तालुक्यातील काही क्षेत्रात गोवंश वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात मिळून येत असल्याचे समोर आले असून पशुप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तालुक्यात शेतक-यांच्या पाळीव जनावरांवर रात्रीतून डल्ला मारत अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. यामुळे पशुपालक हैरान झाले आहेत. विशेषता या अवैध जनावरांच्या वाहतुकीचे मुख्य मार्ग गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, ककोडी – चिचगड, चिचगड – नवेगावबांध असल्याचेही बोलले जात आहे.  आजच्या घटनेमुळे देवरी शहरात चर्चेला उधान आले आहे. देवरी वरुन चिचगड मार्गेच वाहन जात असल्याचे चित्र वाहनाला बघुन वाटत असल्याने अनेक नागरीकानीं प्रश्न निर्मान केला आहे. शहराच्या चिचगड रोडवरील मनोहर भाई पटेल शाळेसमोर वाहन रात्री पासुन उभा असल्याने व सकाळी वाहन हालत असल्याचा त्या परिसरातील नागरीकांना निदर्शनात आल्याने नागरीकांनी वाहनाचा दार उघडताच त्यावाहनात सहा जनावरे ऐकावर ऐक कोबुंन ठेवन्यात आले असल्याने नागरीकांनी त्या वाहनाला पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन वाहन सोडत रात्रीच पसार झाला असल्याचेही बोलले जात आहे. पोलीसांनी सदर घटनेचा पंचनामा करून वाहन ताब्यात घेतले आहे. सदर जनावरे कोबुंन नेनारे वाहन कुनाचे व कोबुन ठेवलेली जनावरे कुनाची याचा शोध देवरी पोलिस घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्राम मुंडीपार में पेयजल बनी गांव की मुख्य समस्या, पानी टंकी की क्षमता कम, और लाभार्थी हुए अधिक

Fri Nov 25 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया :- गोरेगांव तहसील में इन दिनों 30 ग्राम पंचायतों में चुनावों को लेकर उल्टी गिनती शुरू हो गई है यहां गांव में स्थित समस्याएं चुनावी मुद्दा बनने जा रही है यहां अधिकतर गांव में पेयजल, आवास योजना, जर्जर सड़कें, व स्वच्छता जैसी समस्याएं वर्षों से बनी हुई है जिसमें ग्राम मुंडीपार जलापूर्ति योजना होने के बावजूद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com