कुही :- हद्दीतील उमरेड ते कुही रोडने अवैध्यरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अश्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून दि. २१/०४/२०२४ चे रात्री ०१.०० वा. पोलीस स्टेशन कुही येथील अधिकारी व स्टॉफ सह वरीष्ठांना माहिती देवुन दिपक अग्रवाल सा. भापोसे तथा ठाणेदार पोस्टे कुही यांचे नेतृत्वात सिल्ली शिवार येथे नाकाबंदी दरम्यान १२ चक्का टिप्पर क्र. एम. एच. ४०/सी टी-७९६२ चा चालक नामे दिपक मधुकर शेन्डे वय २६ वर्ष रा. कळमना आचार्य ता. जिल्हा नागपूर याला विचारपुस करून विना रॉयल्टी रेती १० ब्रास रेती किं. ६०,०००/- रू भरून वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने नमुद आरोपीच्या ताब्यातुन टिप्पर किं. ४०,००,०००/- रू व १० ब्रास रेती किंमती ६०,०००/- रू. असा एकुण ४०,६०,०००/- रू. मुद्देमाल जप्त करून पुढील कार्यवाही करण्यात आली.
कार्यवाही पथक पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार भापोसे, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार भापोसे दिपक अग्रवाल पोस्टे कुही यांच्या नेतृत्वात पो.उप.नि. स्वप्नील गोपाले, पोहवा ओमप्रकाश रेहपाडे, पो. अंमलदार अनिल करडखेले, गोकुळ सलामे, विकेश राउत, भुमेश्वर भेंडारकर, राहुल देवीकर, अर्जुन यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.