तुम्ही हे वाचाल तर अवाक किंवा थेट ठार वेडे व्हाल…..

ज्यांची वेश्या वृत्ती असते तेच असे हमखास वागतात, काही मिळो अथवा ना मिळो अगदी दारिद्रयात देखील जी संसाराचा गाडा हाकते ती पतिव्रता असते आणि एक जुनी म्हण आहे,सका पाटील मेला म्हणून लगेच तुका पाटील केला, यापद्धतीने जी वागते तिलाच वेश्या म्हणतात. जर माझी माहिती खरी असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा श्याम मानव हे देखील वेश्या प्रकारातच मोडतील म्हणजे अलीकडे महायुती सरकारकडे याच श्याम मानव यांनी त्यांच्या उपक्रमासाठी थेट 30 कोटी रुपये मागितले होते जी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षणार्धात धुडकावून लावली, अजित पवारांनी रक्कम देण्यास फारसा विरोध दर्शविला नव्हता पण देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या धुडकावण्याला दुजोरा दिला….तेथेच श्याम मानव यांची सटकली असावी ते थेट फॅशनेबल कुटुंब आणि नेते अनिल देशमुख यांना जाऊन मिळाले, अनिलबाबूंना आयतेच कोलीत मिळाले, त्यांनी मग डोक्यात कायम सडके विचार ठेवून वाटचाल करणाऱ्या काकाची भेट घालून दिली त्यानंतर कधी नव्हे ते आता श्याम मानव यांना देखील राजकारणाचा ज्वर चढला…त्यानंतर त्यांनी अनिल देशमुख या सर्वस्वी बदनाम भ्रष्ट आणि बदमाश नेत्याला महान ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे ज्यातून अनिलबाबू पुन्हा एकवार स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतील आणि जेव्हा केव्हा महाआघाडी सत्तेत येईल तेव्हा पैसे उडविण्यासाठी मला 30 कोटी नक्की मिळतील, या भोळ्या आशेवर श्याम मानव म्हणे यादिवसात मनोरथ रचताहेत …वरून त्यांना फुकाची प्रसिद्धी देखील मिळवून दिल्या जाते आहे. अजून त्यातले एक हमखास घडणारे जुगाड सांगतो म्हणजे आंदोलन ते मराठा आरक्षणाचे असो कि श्याम मानव यांच्या हलकट पठडीतले, टार्गेट कधीही एकनाथ शिंदे नसतातच, ते अलगद सुरक्षित असतात, दुरून गम्मत बघतात सॉफ्ट टार्गेट एकमेव, देवेंद्र फडणवीस असतात, फडणवीस एकटे एकाकी लढताना दिसतात इतर सारेच केवळ गम्मत बघतात. ज्या एकनाथ शिंदे यांनी श्याम मानव यांना धुडकावून हाकलून लावले ते शिंदे सेफ कारण शिंदे विरोधात बोलले तर ज्यां मराठ्याना श्याम मानव घाबरतात ते मराठे थेट अंगावर धावून येतीलआणि बादरायण संबंध लावून दुकानदारी जमली नाही म्हणून लढा कोणाशी तर केवळ देवेंद्र फडणवीसांशी, प्रत्येकाचे भांडण वाट्यावरून राष्ट्र मेले तरी चालेल…

आता पुढला मुद्दा तेवढाच महत्वाचा. वास्तविक आरक्षणाचा तिढा सोडविण्याची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांची त्यात हे तर एकदम उघड कि जरांगे पद्धतीचे पवार पद्धतीच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर चालणारे नेते, फडणवीसांना राजकारणात बरे दिवस असले आले कि जरांगेंना लगेच अचानक जोर चढतो आणि मुख्यमंत्री असूनही शिंदे किंवा इतर मान्यवर मराठे राहतात बाजूला, आंदोलनकर्ते थेट अंगावर शिंगावर घेतात फक्त आणि फक्त फडणवीसांना….आणि हा अभिमन्यू सतत एकाकी लढताना त्याच्याच भाजपा मधले समस्त मराठे अगदीच एखादा दुसरा नितेश राणे, प्रसाद लाड , प्रवीण दरेकर पद्धतीचा अपवाद सोडल्यास राज्यातले महायुती आणि भाजपाचे समस्त नेते हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून केवळ गम्मत किंवा चाललेला तमाशा बघण्याचे काम तेवढे अगदी सवड काढून करतात.

तुम्हाला कदाचित माहित नसेल फडणवीस विखे पाटील यांच्यावर पितृवत आणि सुजय यांच्यावर धाकट्या भावासारखे प्रेम करतात त्यापद्धतीने सतत लाड करतात, आणि भाजपा महायुतीतले या पद्धतीचे आशिष शेलार, विनोद तावडे राधाकृष्ण विखे पाटील मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या प्रभावी आमदार मेघा साकोरे त्यांचे पिताश्री रामकृष्ण बोर्डीकर, संभाजी पाटील निलंगेकर, हरिभाऊ बागडे, रावसाहेब दानवे , आमदार सुनील राणे, राहुल नारवेकर, सिद्धार्थ शिरोळे , अमित साटम ,अभिमन्यू पवार, बबनराव लोणीकर, राणा जगजितसिंग पाटील, उदयनराजे आणि शिवेंद्र राजे भोसले जे थेट शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आणि ज्यांच्या शब्दाला समस्त मराठ्यांमध्ये मान आहे , किंवा महायुतीचे प्रतापसिंग जाधव दिलीप वळसे पाटील पद्धतीचे अनेक मान्यवर नेते किंवा चाळीसगावचे मंगेश चव्हाण, डॉ राहुल आहेर, सीमा हिरे, राहुल ढिकले, चंद्रकांत दादा पाटील, राहुल कुल,महेश लांडगे, सोलापूरचे सुभाष देशमुख, पंढरपूरचे आमदार समाधान औताडे, जयकुमार गोरे, माजी खासदार संजयकाका पाटील, सुरेश धस, प्रताप पाटील चिखलीकर, बबनराव पाचपुते, राजवर्धन कदमबांडे, धनंजय महाडिक, मुरलीधर मोहोळ पृथ्वीराज देशमुख माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण रणजितसिंह निंबाळकर असे आणखी असे कितीतरी प्रभावी धाडसी नेते विशेषतः भाजपा आणि महायुतीकडे राज्याच्या कानाकोपऱ्यात आहेत, ज्यांचा केवळ इशारा देण्याचा अवकाश, पुढल्या क्षणी आंदोलनकर्ते आपापल्या पोटापाण्याला लागतील….

देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री असतांना आणि आज उपमुख्यमंत्री असतांना त्याआधी ते भाजपा प्रदेशाध्यक्ष असतांना त्यांनी या पद्धतीच्या मराठा नेत्यांना अनेक बाबतीत सहकार्य करून ज्यापद्धतीने कधी संकटातून बाहेर काढले आहे, अशोक चव्हाण सारख्या कित्येकांना तुरुंगात जाण्यापासून वाचविले आहे अगदी सतत भरघोस मदत केली आहे किंवा आजही खालची मान वर न करता हेच फडणवीस विशेषतः कोणत्याही विचारांच्या पक्षाच्या मराठ्यांना प्रसंगी रिस्क घेत सहकार्य करतात आज हेच समस्त समाजमान्य मराठे नेते जेव्हा जरांगे यांच्या आंदोलनात फडणवीसांची होणारी गळचेपी त्याकडे गम्मत म्हणून बघतात, म्हणजे हे तर असे झाले कि एखाद्या तरुणीवर भर रस्त्यात बलात्कार होतांना बघे जसे टाळ्या वाजवितात किंवा फोटो व्हिडीओ काढतात अगदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील यापद्धतीची फडणवीसांची फजिती बघण्यात जेव्हा एकप्रकारे विकृत आनंद होतो तेव्हा तळपायाची आग मस्तकात पोहोचते आणि इकडे फडणवीस त्या प्रभू श्रीरामासारखे या मंडळींकडे सतत प्रसन्न नजरेने बघतात, ऑफ द रेकॉर्ड सांगतो, माझ्याकडे जेव्हा महायुतीच्या अनेक नेत्यांच्या जबरी आर्थिक भानगडी येतात तेव्हा याच फडणवीस गटाकडून, कोणालाही अडचणीत टाकू नका पद्धतीच्या सूचना येतात आणि तेच नेते आज फडणवीस यांनी एकाकी टाकून पुनःपुन्हा नेहमीच्या दुकानदारीत मग्न होतात जणू एक बलात्कार होतांना त्याकडे गम्मत म्हणून बघतात…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीक्षाभूमी परिसरात दररोज 18 तास पाण्याचा उपसा

Sat Jul 27 , 2024
– अग्निशमन विभागाचे जवान पावसातही कर्तव्यावर नागपूर :- दीक्षाभूमी परिसरात पार्किंगसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. पाणी उपसण्यासाठी आठ मोटारपंप लावण्यात आले आहेत. यापंपाव्दारे दररोज 18 तास पाणी ओढण्याचे काम सुरू आहे. मात्र, मधून मधून पाउस येत असल्याने पाणी उपसण्यासाठी बर्‍याच अडचणी येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com