संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपूर :-श्री गजानन शिक्षण सेवा संस्था नागपूर द्वारा महीला सक्षमीरणासाठी संघर्ष जगण्याचा प्रशिक्षण २०२३ या उक्रमाअंतर्गत गारगोटी नरसाळा येथे मेनबत्तीचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांनी सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून देणे, विकासाठी संधी उपलब्ध करून देणे, स्वतःच अर्थ स्वतः निर्माण करावे आणि स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे या दृष्टीने प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम. यावेळी प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती म.बा.क. समिती जि.प. नागपूर, निलेश सोनटक्के मुख्याध्यापक श्री सत्य साई विद्यामंदिर, नंदा ठाकरे कोषाध्यक्ष श्री.ग.शि.से. संस्था, प्रशिक्षक संजय देशमुख, प्रीती भागडकर आणि १०० पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या.