मनुष्यबळाची माहिती तत्काळ सादर न केल्यास कार्यालय प्रमुखांवर कारवाई – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

▪️ निवडणूक विभाग सतर्क

नागपूर :- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हयातील 12 विधानसभा मतदारसंघात असलेल्या शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालय, महामंडळ इत्यादी संस्था व कार्यालयातील मनुष्यबळाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

प्रत्येक मतदारसंघनिहाय निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये मनुष्यबळाची उपलब्धता करता यावी यासाठी सर्व विभागप्रमुखांना आपल्या कार्यालयातील कर्मचारी कळविण्यास सांगितले आहे. याची अंतिम तारीख उलटूनही अजूनपर्यंत अनेक कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांची माहिती विहीत प्रपत्रात काही विभागप्रमुखांनी सादर केली नाही. ज्या कार्यालयाची माहिती प्राप्त झालेली नाही अशा कार्यालयांनी त्वरित माहिती सादर न केल्यास कार्यालय प्रमुखांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिले आहेत.

शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालय, महामंडळ इत्यादी संस्था व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी अद्याप माहिती सादर केलेली नाही अशा कार्यालयांना आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ इटनकर यांनी इशारा दिला. लोकप्रतिनिधी अधिनियमानुसार ही कारवाई करण्याबरोबरच माहे सप्टेंबर 2024 चे वेतन देयक शासकीय कोषागारात स्विकारले जाणार नाही अशी त्यांनी स्पष्ट ताकीद दिली.

माहिती बिनचुक व योग्य विवरणपत्रात प्राप्त होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या https://nagpur.gov.in या संकेतस्थळावर सदर माहिती सादर करण्याचे विवरणपत्र Excel व HOD Certificate चा नमुना सर्वांना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या लिंकवर जाऊन जिल्हाधिकारी नागपूर यांचे कार्यक्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयांनी विहित नमुन्यात आपल्या अधिनस्थ असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची बिनचुक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास प्रत्यक्ष तसेच सॅाफ्ट कॅापीमध्ये सादर करावयाची आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी घेतले गणरायांचे दर्शन

Sun Sep 15 , 2024
मुंबई :- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली. मुंबईतील लालबागचा राजा, मुंबई सेंट्रल येथील हमाल मंडळाचा गणपती तसेच गिरगावच्या केशवजी नाईक चाळ येथील मुंबईतील पहिल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्या गणपतीस भेट देऊन राज्यपालांनी दर्शन घेतले. हमाल मंडळाच्या गणपतीची आरती करून राज्यपाल राधाकृष्णन यांनी तेथील गणेश भक्तांशी संवाद साधला. केशवजी नाईक चाळ येथील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com