– आझाद मैदान, मुंबई येथे हजारो आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी केले धरणे आंदोलन
मुंबई :- महाराष्ट्र आशा गटप्रोधक कृती समितीच्या विद्यमाने तसेच कामगार कर्मचारी कृती समिती च्या बॅनरखाली महाराष्ट्रातील हजारो आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी आज आजाद मैदान मुंबई येथे दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करत जीआर काढा तरच संपातून माघार घेणार अशी भूमिका घेत धरणे प्रदर्शन केले. धरणे कार्यक्रमाला नागपूरतून कॉ.राजेंद्र साठे व प्रीती मेश्राम यांच्या नेतृत्वात शेकडो आशा वर्कर व गटप्रवर्तक उपस्थित होत्या. कृती समितीचे शिष्टमंडळ आरोग्य संचालक दिप्ती देशमुख व राज्य आशा स्वाती पाटील यांच्या सोबत चर्चा करून शासनाला कोणी तयार करण्याकरता पत्र व्यवहार करावे व बी एल ओ कामाची सक्ती बंद करून मराठा आरक्षण सर्वेक्षण कामाची सक्ती सुद्धा बंद करावी तसेच थकित मानधन त्वरित काढावे यावर चर्चा केली असता त्वरित पत्र काढण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
आरोग्य सहसचिव कोलते साहेब यांच्याशी चर्चा केली असता मंत्रिमंडळाच्या मंजुरी करता प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु परवा होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी करतात उद्या परत प्रस्ताव पाठवून मंजूर करण्यास भाग पाडण्याकरता आम्ही प्रयत्न करणार असे त्यांनी आश्वासन दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जीआर बाबत निर्णय घेतल्यास कृती समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना तीव्र आंदोलन करण्याकरता भाग पाडेल अशी घोषणा करण्यात आली.