संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शासनाकडून श्रावणबाळ,इंदिरा गांधी ,संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्तींना ठराविक मानधन अदा केले जाते.कामठी तहसील स्तरावरून लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा केले जाते मात्र आता लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीबीटी मार्फत मानधन जमा करणे सुरू झाले आहे.त्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड हे मोबाईल नंबरशी लिंक स्थानिक आधार कार्ड केंद्रातून करून घ्यावे तसेच आपले बँक खाते क्रमांकास आपले आधार कार्ड सोबत तात्काळ लिंक करण्याची कारवाही बँकेतून पूर्ण करावी अशी केवायसी प्रक्रिया न केल्यास प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांचे डीबीटी द्वारे अनुदान संबंधित बँक खात्यात जमा होणार नाही तेव्हा लाभार्थ्यांनी डीबीटी द्वारे अनुदानचा लाभ घेण्यासाठी केवायसी करून घ्यावे असे आवाहन कामठी तहसीलदार गणेश जगदाळे तसेच संजय गांधी अनुदान योजनेचे नायब तहसीलदार मयूर चौधरी यांनी केले आहे.
संजय गांधी ,श्रावणबाळ ,इंदिरा गांधी निराधार योजनांच्या लाभासाठी यापूर्वी कामठी तहसील कडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता तो निधी बँकेकडून होता.या प्रक्रियेस विलंब होत होता त्यामुळे लाभार्थ्याना अनुदानासाठी बँकेत खेटे घालावे लागत असल्याच्या चर्चेला उधाण होते.लाभार्थ्यांचे मानधन आता डीबीटी च्या माध्यमातून होणार आहे .प्रत्येक लाभार्थ्यांनी डीबीटी सुविधेकरिता आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक केवायसी करून घ्यावे .मानधन थेट खात्यात वर्ग केले जात आहे.याच पाश्वरभूमीवर कुणी लाभार्थी अनुदाना पासून वंचीत न राहावे यासाठी महादुला नगर पंचायत येथे डीबीटी शिबिर राबविण्यात आले ज्याचा मोठ्या संख्येतील लाभार्थ्यांनी लाभ घेतला.