संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आपसी मतभेद विसरून विकास कामासाठी सर्वांनी सहकार्य केले तर गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे होऊन गाव आदर्श होत असल्याचे मत येरखेडा – भिलगाव जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य मोहन माकडे यांनी घोरपड -शिरपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रोड नाली बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले कामठी – मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचद सावरकर यांच्या स्थानिक निधीतून मंजूर केलेल्या 15 लाख रुपयाच्या सिमेंट रोड व नाली बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी माजी सभापती उमेश रडके ,सरपंच तारा बलवनत कडू ,उपसरपंच अनिकेत वानखेडे ग्रामपंचायत सदस्य गीता पांडे , भारती मानमूढरे, सुनीता कोर्वेकर , कुणाल कडू सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी श्याम उंचेकर यांनी केले .