अमरावती :-दहा बारा वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या पायाशी गोंडा घोळणाऱ्या अनिल बोंडे यांनी भाजप तर्फे खासदारकीची चोळी बांगडी मिळतात उद्धव ठाकरे यांच्यावरच दुगाण्या झाडणे सुरू केले असून खासदारकीच्या मिठाला जागण्याची इमानदारी साजेशी असली तरी उद्धव ठाकरे विरुद्ध तोंडाची वाफ दवडताना राहुल गांधी यांच्या बद्दल अवमानकारक भाषा वापरून केवळ जिभेची खाज मिटवली असून यापुढे त्यांच्या तोंडून अशीच घाण निघाल्यास पुन्हा जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही ऍड दिलीप एडतकर यांनी दिला आहे.
राहुल गांधींना जोडे मारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये आहे का ? असा शंभर नंबरी बेवडा सवाल विचारणाऱ्या डॉक्टर अनिल बोंडे मध्ये सावरकरांवर फुले उधळण्याची हिंमत आहे का ? असा प्रति सवाल दिलीप एडतकर यांनी विचारला आहे. विनायक दामोदर सावरकरांना भाजपवाले स्वातंत्र्यवीर म्हणतात त्याच सावरकरांना महाराष्ट्राचे ख्यातनाम साहित्यीक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी स्वातंत्र्यवैरी म्हटले होते याची आठवण देत ऍड दिलीप एडतकर यांनी दुर्दैवाने बहुजन समाजात जन्म घेतलेल्या डॉ. अनिल बोंडे यांचे सावरकर प्रेम फारच उतू आले असेल आणि त्यांच्या अणू रेणूत सावरकरांबद्दलचा अतीव आदर उफाळून आलाअसेल तर त्यांनी महाराष्ट्रात अभावानेच आढळणारा सावरकरांचा पुतळा अमरावतीत उभारून दाखवावाच असे आव्हानच दिले आहे.
ज्या माफीविर सावरकरांची तळी भाजपच्या खासदारकीचे लाभार्थी डॉ. अनिल बोंडे उचलत आहेत त्या सावरकरांचा असा अचानक पुळका येण्याचे कारण आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खिरापत मिळण्याची आशा तर नाही ना ? असा सवालही ऍड दिलीप एडतकर यांनी विचारला आहे.