नागपूर :- आशा वर्कर्स व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू ) नागपूर जिल्हा कमिटीची विस्तारित बैठक रवी भवन सभागृहात पार पडली. बैठकीमध्ये सर्वांनुमते आशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी आधी भाऊबीज निधी न मिळाल्यास 26 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी नागपूरच्या संविधान चौकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री -एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री-देवेंद्र फडणवीस व नागपूरचे वजनदार मंत्री-चंद्रशेखर बावनकुळे यांची हजारो आशा वर्कर व गटप्रवर्तक ओवाळणी करणार असा निर्णय घेण्यात आला.
(१) आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना १० हजार रु. भाऊबीज रक्कम द्या.
(२) मागील शासनाने विचार केल्याप्रमाणे किमान वेतन द्या.
(३) आशा व गटप्रवर्तक यांचे परिवारास आरोग्य विमा लागू करा.
(४) आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना संमान जनक वागणूक द्या.
याव्यतिरिक्त विविध विषयावर ठराव मंजूर करण्यात आले. कॉ.राजेंद्र साठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सीटू जनरल सेक्रेटरी कॉ. दिलीप देशपांडे, कॉ.प्रीती मेश्राम, कॉ. रंजना पौनिकर, कॉ.माया कावळे, कॉ.अर्चना निर्मले उपस्थित होते.