आयसर ट्रकची मोटरसायकलला धडक तरुण ठार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील खापरखेडा टी पॉइंट वर नागपूर वरून कामठी कडे येत असलेल्या मोटरसायकला आयसर ट्रकने धडक दिल्याने तरुण ठार झाल्याची घटना आज रविवारी सकाळी साडेआठ वाजता सुमारास घडली.

जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एहतेश्याम अहमद इम्तियाज अहमद (२९) रा. इस्माइलपुरा कामठी हा ऑरेंज सिटी स्टील कंपनी खैरी येथे रात्रपाळी ड्युटी करून सकाळी आठ वाजता सुमारास मोटरसायकल क्रमांक एमएच ४० सीआर ०७१३ ने कामठीला घरी जात असताना नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील आशा हॉस्पिटल समोर खापरखेडा टी पॉइंट जवळ नागपूर वरून कामठी कडे येत असलेल्या अज्ञात ट्रकने सकाळी साडेआठ वाजताचे सुमारास धडक दिल्याने एहतेश्याम अहमद इम्तियाज अहमद हा गंभीर जखमी झाला असता त्याला नागरिकांनी उपचारासाठी जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात भरती केले असता उपचारादरम्यान दुपारी साडेतीन वाजताचे सुमारास निधन झाले. घटनेची माहिती जुनी कामठी पोलीस स्टेशनला मिळतात पोलिसांनी खाजगी रुग्णालयात जाऊन पंचनामा करून प्रेत उत्तररिय तपासणी करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे मृतकाचे मागे पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी असा मोठा आप्त परिवार आहे जुनी कामठी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस )281, 125 (बी )106 (1) एक अन्वेय नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस मुलानी करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाच्या संयुक्त चमूने वाचविले १०० नागरिकांचे प्राण

Mon Jul 22 , 2024
– विभागीय आयुक्तांनी केली परिस्थितीची पाहणी – मनपा आयुक्तांकडून जाणून घेतली शहरातील परिस्थितीhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 नागपूर :- शहरात शनिवारी सकाळी झालेली मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले, शहरातील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेकजन पाण्यात अडकून पडले, अशा नागरिकांसाठी नागपूर महानगरपालिका, नागपूर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त चमू देवदूतच ठरले. मनपाच्या संयुक्त चमूने विविध ठिकाणी पावसात अडकून पडलेल्या १०० नागरिकांचे प्राण वाचविले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com