‘आयएएस प्रोबेशनर्स’ मेट्रो भवनात, अधिकाऱ्यांशी साधला संवाद

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

नागपूर : भारतीय प्रशासकीय सेवाच्या (आयएएस) अधिकाऱ्यांनी आज मेट्रो भवनला भेट दिली. २०२०-२१ बॅचच्या या अधिकाऱ्यांनी मेट्रो प्रकल्पाच्या पायभरणीपासून ते पायाभूत सुविधांमध्ये गाठलेल्या सर्वोच्च शिखरापर्यंतची इत्यंभूत माहिती सादारीकरणाद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटीतून घेतली.

या आयएएस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाअंतर्गत सध्या महाराष्ट्र दर्शन टप्पा दोन सुरू असून ते विदर्भात प्रशिक्षणासाठी नागपुरात आले आहेत. मेट्रो प्रकल्पाची प्रत्यक्ष झलक पाहण्यासाठी आणि त्याचे मूलभूत कामकाज समजून घेण्यासाठी त्यांनी आज मेट्रोभवनला भेट दिली. महा मेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे यांनी या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या अधिकाऱ्यांनी मेट्रोभवनमधील विविध विभागांना भेटी दिल्या. एक्सपरियन्स सेंटर, प्रदर्शन केंद्र, वाचनालय, मेट्रो भवनच्या वर्तुळाकार गॅलरीबाबत या अधिकाऱ्यांनी उत्सुकतेने माहिती घेतली. त्यांना महामेट्रोचे ऑपरेशनल कंट्रोल सेंटर (ओसीसी) देखील दाखवण्यात आले. या अधिकाऱ्यांना ट्रेनचे कामकाज आणि ऑपरेशनल कंट्रोल सेंटरच्या इतर बाबीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या अधिकाऱ्यांना मेट्रो ऑपरेशन्सच्या 6-डी बीम मॉडेल, गेल्या काही वर्षांमध्ये साध्य केलेली प्रगती, अंमलबजावणीदरम्यानची आव्हाने इत्यादींचे सादरीकरण करण्यात आले.

महामेट्रोला मिळालेले पुरस्कार आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील उपलब्धी, आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सची माहिती या आयएएस अधिकाऱ्यांना देण्यात आली. सिंगल पिअरवरील डबल डेकर उड्डाणपूलामुळे साध्य होणारी शाश्वतता, प्रकल्पाच्या खर्चात बचत सुनिश्चित करणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, नॉन-फेअर बॉक्स रेव्हेन्यूला चालना देण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न यासारख्या तसेच इतर प्रमुख समस्यांची माहिती त्यांना देण्यात आली. नाशिकमध्ये सादर करण्यात येणाऱ्या मेट्रोनिओ प्रकल्पातील तंत्रज्ञानामुळे अधिकारी विशेषतः प्रभावित झाले. संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे यांच्याशी अधिकाऱ्यांनी अनेक विषयांवर संवाद साधला. कोकाटे यांनी महा मेट्रोच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावणाऱ्या प्रमुख बाबींवर प्रकाश टाकला. संस्थेच्या तक्रार निवारण यंत्रणेने प्रकल्पाच्या चांगल्या अंमलबजावणीत मदत झाल्याचे कोकाटे यांनी त्यांना सांगितले. महामेट्रोने साकारलेल्या प्रकल्पाचे या अधिकाऱ्यांनी खूप कौतुक केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गौतम नगर मे जलापूर्ति नहीं फिर भी नगर परिषद से पाणी बिल की वसूली, भाजपा ने किया विरोध

Fri Feb 10 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – भाजपा ने किया विरोध कामठी :- स्थानीय गौतम नगर जूनी छावनी परिसरात नगर परिषद द्वारा जलापूर्ति होत नाही तरी सुद्धा नगर परिषद द्वारा जलापूर्ति बिल वसुलण्यात येत आहेत याचा विरोधात भाजपा शहर महामंत्री उज्ज्वल रायबोले यांच्या नेतृत्व मधे पाणी पुरवठा अधिकारी अवि चौधरी यांना आज शुक्रवारी दुपारी निवेदन देण्यात आले गौतम नगरात नगर परिषदद्वारा पाईपलाईन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com