मतदारांचा विश्वास कायम जपत राहीन! – चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

· कामठीच्या विकासासाठी एक मताचे कर्ज मागतोय!

कामठी :- हिंदू असो, मुस्लिम असो, मागासवर्गीय असो, प्रत्येकाचे हित तुम्ही दिलेल्या उमेदीत आहे. जात-पात आणि धर्मभेद विसरून एकत्र येऊन कामठीच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी मदत करावी. 15 वर्षे कामठीच्या विकासासाठी काम केले. पुढील पाच वर्षेही तुम्ही दिलेला विश्वास जपत राहील, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसेच भाजपा-महायुतीचे कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. येत्या निवडणुकीत जनतेच्या एक मताचे कर्ज मागून, विकासाच्या वचनाचा नवा संकल्प घेतला.

मंगळवार दि. 12 रोजी त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघातील विहिरगाव, उंबरगाव, कळमना, रामगड, कामठी शहरातील विविध भागात भेटी दिल्या व दीपावली मिलन सोहळ्यात सहभागी झाले. मतदारांमध्ये नवा विश्वास भरताना, ते म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या 58 योजनेच्या भरवश्यावर या भागाचा विकासाचा आराखडा तयार करून विकासकामे पुढे घेऊन जाणार आहे.

निवडणुकीत विरोधकांकडून होणाऱ्या अपप्रचाराचा उल्लेख करताना बावनकुळे यांनी मतदारांना खोट्या नॅरेटिव्ह पासून जागरुक राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले या भागातला प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. कामठी शहरात सुलेखाताई कुंभारे यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे या भागाच्या विकासाचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्यासोबत मनीष वाजपेयी, विवेक मंगतानी, लाला खंडेलवाल, अजय अग्रवाल, पंकज वर्मा, संध्या रायबोले, चंद्रशेखर तुप्पट, उज्वल रायबोले, लालसिंग यादव, विजय कोंडुलवार, कपिल गायधने, राज हाडोती, कुणाल सोलंकी, दीपक नेटी, पप्पूजी राऊत, सूरज शिंदे, नरेश पारवानी, रामजी शर्मा, संदीप कनोजिया, योगेश गायधने, कैलाश मलिक, सुभाष भात्रा उपस्थित होते.

मुख्यमंत्री योगींसोबत सभा

बावनकुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम, नागपूर जिल्ह्यातील नागपूर मध्य आणि नागपूर दक्षिण विधानसभा क्षेत्रात प्रचारसभांमध्ये सामील झाले. या सभामधून त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करताना भाजपा- महायुती सरकार महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा विश्वास मतदारांना दिला. विरोधकांकडे विकासाचे काहीच मुद्दे नसल्याचे आरक्षण आणि इतर मुद्दयांवर निवडणूक लढवित आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समाजात फूट पाडून आरक्षण हडपण्याचा काँग्रेसचा डाव हाणून पाडा - पुणे येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

Wed Nov 13 , 2024
पुणे :- दलित, मागासवर्गीयांमध्ये फूट पाडून, त्यांना परस्परांशी संघर्ष करावयास लावून त्यांचे आरक्षण हिसकावून घेण्याचा काँग्रेस व महाविकास आघाडीचा कट असून महाराष्ट्राची जनता हा कट राज्यात यशस्वी होऊ देणार नाही. केवळ विकास आणि जनहिताच्या मुद्द्यास प्राधान्य देणाऱ्या महायुतीला पुन्हा एकदा संधी देऊन महाराष्ट्राला देशाच्या प्रगतीचा आधार बनविण्यासाठी एक व्हा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथे महायुतीच्या उमेदवारांकरिता आयोजित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com