– नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गलगतच्या कोंढाळीनजिक हॉटेल संग्राम मधील घटना
– कोवळ्या मुलांचे छत्र हरपले, परिसरात हळहळ
कोंढाळी-काटोल :– कोंढाळी पोलीस स्टेशन कोंढाळी अंतर्गत येणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53/6 तसेच एशियन हायवेज् संख्या 46 च्या रिंगणाबोडी शिवारातील संग्राम हॉटेल येथे गुरुवार (दि.30)चे रात्री अंगठी वरुन पति पत्नी मधे झालेल्या वादाचे रूपांतर दोघांमधे हाणामारीत झाले व मारहाणीत पतीचा मृत्यु झाला.
मिळालेल्या माहितीनुसार माधव उर्फ रोहित रामराव जाधव (33) असे मृतकाचे नाव असून आरोपी पत्नी संध्या उर्फ सुरेखा माधव जाधव (27) हीला कोंढाळी पोलीसांकडून अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.
कोंढाळी पासून जवळच असलेल्या रिंगणाबोडी शिवारातील संग्राम हाॅटेल येथे दोन वर्षापासून रोहित उर्फ माधव रामराव जाधव (33)रा .पिपराळा, ता.बसमत,जि.हिंगोली येथिल रहिवाशी पत्नी संध्या उर्फ सुरेखा ,नऊ व सात वर्षाच्या दोन मुलांसोबत संग्राम हॉटेल येथे काम करण्यासाठी आला होता. मृतक रोहित यास दारूचे व्यसन असल्यामुळे तो नेहमी पत्नीचे दाग दागिने विकून दारू प्यायचा .त्यामुळे त्यास संग्राम हॉटेल येथून कामावरून काढून टाकण्यात आले होते .त्यानंतर तो लगेचच हाॅटेल येथे काम करू लागला परंतु तिथेही दारूच्या व्यसनामुळे कामावरून काढण्यात आले .पत्नी संग्राम हॉटेल मध्येच कामावर होती व तेथिल एका खोलीत राहून दोन मुले व पतीचा सांभाळून उदरनिर्वाह चालवित होती.
घटनेच्या दिवशी गुरवार(दि.30) सकाळी रोहित याने पत्नीची पंचविस हजार रुपयाची सोन्याची अंगठी नेवून बाजारगाव येथे विकली व दारू पिऊन रुम वर आला यावर आरोपी पत्नी संध्या ने याबाबत विचारले असता वाद निर्माण होऊन त्याचे रुपांतर मारहाणीत झाले हे दृश्य नऊ वर्षीचा मुलगा पाहात होता .यात दोघांनी एकमेकांना मारहाण केली तर आरोपी पत्नीने मृतक पतीच्या छातीवर पायाने मारले यात छातीच्या बरगड्या तुटल्या व तो गतप्राण झाला .पती हालचाल करीत नसल्याचे बघून आरोपी पत्नीने हाॅटेलवर काम करीत असलेल्या संगिता मसराम व रितेश यांना माझा पती कसा तरी करतो म्हणून पाहायला बोलावून हाॅटेल वर उभी असलेल्या वाहनाने कोंढाळीतील प्राथमिक उपचार केंद्रात आणले असता डाॅक्टरांनी मृत घोषित करून पोलीसांना माहिती दिली.
लगेच ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांचे आदेशानुसार पो उ नि धवल देशमुख,ए एस आय राजकुमार कोल्हे ,एन पी सी मनोज आगरकर यांनी घटना स्थळी जावून पाहणी करून आरोपी पत्नीला अटक केली .या घटनेची माहिती माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बापू साहेब-रोहोम यांना मिळताच घटनास्थळ गाठून माहिती घेतली .हि घटना गुरुवार (दि.30)चे रात्री 10.30चे सुमारास घडली . 31जानेवारी शुक्रवार ला सकाळी फाॅरन्सिक चे एपीआय सचिन लांडगे,एच सी विनीत शेंडे,एनपीसी आजम सौदागर, डीपीसी कडील केंद्रे यांनी घटना स्थळाची संपुर्ण पाहणी केली .
उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून तपास केला असता मोठा नऊ वर्षाचा मुलाने माहिती दिली की .माझे वडील दारू पिऊन आले व घरी आईने अंगठी विचारली यावरुन त्याच्यात वाद झाला व एकमेकांना मारहाण करत होते यात मम्मीने पप्पांच्या छातीला जोरात पायाने मारले असे सांगितले .
पप्पांची परत येण्याची आस ,हृदयाला पाझर फोडणारे बोल
— मोठा मुलगा वयाने छोटा परंतु हुशार माझे पप्पा दवाखाण्यात गेले ते परत येतिल ही आशा .त्या कोवळ्या बालकांना काय समज पितृछत्र हरवून गेले ते कधीच न मिळण्यासाठी . कोवळ्या बालकांना काय माहित कि वडील कायमचे गेले तर आई पोलीस कोठडीत .
या खुनातील पत्नी विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून तिचे विरूध्द कलम 103/1,बी एन एस 2023 नुसार नोंद करून अधिक तपास ठाणेदार राजकुमार त्रिपाठी करीत आहेत.
या प्रकरणी व्यसनाधीनतेने पितृ छत्र हिरावल्या गेले तर माता जेल मध्ये कोवळ्या बालकांच्या डोक्यावरिल हरविलेल्या छत्राबाबद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.