संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बि बी कॉलोनी येथे भाड्याच्या घरात वास्तव्य करीत असलेल्या दोन भाडेकरूत हात उधारीने दिलेल्या 2 हजार रुपयांच्या मागणीच्या वादातून आरोपीने भाडेकरू पती पत्नीला घरगुती चाकूने वार करून जख्मि केल्याची घटना कालरात्री साडे दहा दरम्यान घडली असून यामध्ये पती आनंद श्रीरामे व त्याच्या पत्नी जख्मि झाली आहे यासंदर्भात फिर्यादी जख्मि आनंद श्रीरामे ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अमित मोंगरे विरुद्ध भादवी कलम 324,504 अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.
..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पारसीपुरा निवासी श्रीकांत गुजर यांच्या मालकीच्या बी बी कॉलोनी घरात सदर जख्मि फीर्यादी व आरोपी दोन वेगवेगळ्या खोलीत भाड्याने वास्तव्य करीत असून काही दिवसांपूर्वी जख्मिने आरोपीला दोन हजार रुपये उधार स्वरूपात दिले होते यातील आरोपीने उधार घेतलेल्या दोन हजार रुपयातून 1 हजार रुपये परत केले मात्र उरलेले 1 हजार रुपये परत करण्यास टाळाटाळ करीत होता.यासंदर्भात काल रात्री आरोपी व फिर्यादी मध्ये झालेल्या वादात आरोपीने रागाच्या भ्रमात घरातील घरगुती चाकू मारून जख्मि केले यावेळी फिर्यादी पत्नी पतीचा बचाव करण्यास आले असता फिर्यादी पत्नीला सुदधा चाकूने मारून जख्मि केले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेत जख्मि पती पत्नीला उपचारार्थ हलविण्यात आले. वेळीच पोलीस पोहोचल्याने जीवघेणा अनर्थ टळला.पोलिसांनी आरोपीस अटक केले असून पुढील तपास सूरु आहे.