रामटेक :- बाल संगोपन योजनेअंतर्गत शंभराहुन अधिक अनाथ मुलांना महीण्याचा आर्थिक लाभ करवुन देण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. रामटेक तालुक्यातील रामटेक, नगरधन, काचुरवाही,चोखाळा,बोरी, मनसर, देवलापार, पुसदा, वडंबा, निमटोला ,सावरा,पवनी, येथील मुलांना व त्यांच्या पाल्यांना महिला व बाल विकास विभाग नागपूर येथे नेऊन त्यांना महीन्याचा लाभ करून देण्यात आले. यावेळी शंकर होलगिरे माजी पं.स.सदस्य, धिरज (प्रफुल) पानतावणे (सामाजिक कार्यकर्ता) शिशुपाल अतकरे उपसरपंच, रामदास बावनकुळे, (सामाजिक कार्यकर्ता) सुरेंद्र सहारे, सुधाकर उईके, अर्चना गुप्ता यांनी पुढाकार घेत आपल्या अथक परिश्रमाने हे करून दाखविले. याकरिता सर्व अनाथ मुलांनी व पालकांनी शंकर होलगिरे माजी पं.स.सदस्य, प्रफुल पानतावणे (सामाजिक कार्यकर्ता) शिशुपाल अतकरे उपसरपंच ,रामदास बावनकुळे (सामाजिक कार्यकर्ता) यांचे आभार मानले.
शेकडो अनाथांना करवुन दिला महीन्याचा लाभ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com