नागपूर :-“आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या दिवशी, २०२३ चे १० डिसेंबरला, असंगठित कामगारांच्या हक्कांच्या आणि नेतृत्व विकासाच्या विषयी एक सेमिनार आयोजित केले होते. कॉन्फेडरेशन ऑफ फ्री ट्रेड युनियन ऑफ इंडिया (सीएफटीयूआई) यांनी नागपूरच्या लोहिय अध्ययन केंद्राच्या मधु लिमये स्मृती हॉलमध्ये सेमिनार आयोजित केला. राष्ट्रीय श्रमिक नेते राजेश निंबालकर यांनी या सेमिनारच्या यशस्वी आयोजनासाठी पुढ़ाकार घेतला. सींएफटीयूआय चे राष्ट्रीय पदाधिकारी सुरेश पाटील आणि नंदकुमार महाडीक, हे मुंबई वरुन आले होते. विविध असंगठित कामगार संघठना तील , घरेलु कामगार, स्कूल वॅन चालक, फ़ूड आणि हॉटेल कामगार, औद्योगिक कामगार, ऍप-आधारित कामगार, चित्रपट इंडस्ट्री कामगार, बारा बालुतेदार कामगार, रेलवे मधिल कंत्राटी कामगार, एलआईसी मधिल कंत्राटी कामगार अश्या कामगारचा सक्रिय सहभाग या सेमिनार मध्ये होता. कार्यक्रमाच्या दरम्यान, सुरेश पाटील आणि नंदकुमार महाडीक, सीएफटीयूआईचे मुंबईतील पदाधिकारी यानी समस्त असंगठित कामगार आणी संगठनाना संपूर्ण क़ायदेशिर आणी संघठनात्मक सहकार्य सीएफ़यूआई करेल असे सांगीतले. विविध राष्ट्रीय कामगार परिषदेत नागपुरातील असंगठित कामगार आणी कार्यकर्ता याना आमंत्रित करित त्याना सक्षम करू असे सुरेश पाटिल यानी सर्वाना आश्वस्त केले.बार काउंसिल चे माज़ी सदस्य एड़ सुनील ठोमरे, एड़ धनंजय दामले यानी कामगार अधिकार सुरक्षा आणी न्यायालयींन बाबीसाठी सामाजिक बांधिलकी ठेवत असंगठित कामगाराना सहकार्य करू तसेच श्रमिक क़ायदेअन्तर्गत विविध क्षेत्रातील कामगार संगठना ची नोंदनीसाठी सहयोग करू असे सांगीतले. राजेश निंबालकर यांनी सांगीतले की, सर्व कामगार कायदे संपुष्टात आले आहेत आणी फ़ोर कोड चा मसुदा अजून प्रलंबित आहे यात कुठेही असंगठित कामगार यांचे हिताचे आणी अधिकाराचे रक्षण नाहीं आहे. अशी परिस्थिति असताना, भारतातील असंगठित कामगारांना केवळ मानवाधिकाराचा आश्रय आहे. देशातील ३२ कोटी असंगठित कामगार याना त्यांचे भविष्य आणी सामाजिक सुरक्षा यासाठी लोकतांत्रिक चौकटीमध्ये क्रांतिच उभी करावी लागेल. या कार्यक्रमात उपस्थित होणार्या व्यक्तींमध्ये कामगार नेते संपत वाढई, बारा बलूतेदार कामगार महासंघाचे शंकरराव चुराग़ले, माज़ी नगरसेवक मनोज साबळे, माया घोरपडे, अतुल शृंगारपवार, गजानन जोशी , विजय पलसकर, सुभाष मदपल्लीवार, अभिनव गजभिए, मनाली अग्रवाल, स्मिता माटे, आशा तुमड़ाम, हेमलता लोहवे, रत्नमाला फ़ोफ़रे, भावना फ़ोफ़रे, सुनील घोरपड़े, संजय खड़ागले, संजय गजघाटे, वीरेंद्र पांडे, नितिन वासनिक प्रदीप भातखोर हे होते. सर्व उपस्थिताना सेमिनार चे प्रमाणपत्र वितरित केले गेले.
असंगठित कामगाराना मानव अधिकाराचेच कवच उरले आहे – कामगार नेते राजेश निंबालकर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com