हुडकेश्वर-नरसाळा भाग आता टँकर मुक्त

– 13,850 घरामध्ये पिण्याच्या पाणीचा नियमित पुरवठा

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या सीमेमध्ये समाविष्ट केलेले हुडकेश्वर व नरसाळा भाग टँकर मुक्त घोषित करण्यात आलेले आहे. या भागात 84 टँकर द्वारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी दररोज 10-10 टँकर फेरी सुरु होती. आता मनपाच्या जलप्रदाय विभागाकडून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनामध्ये सार्वजनिक आरोग्य व अभियांत्रिकी विभागामार्फत या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करायला विविध उपाय योजना करण्यात आली. वर्ष 2013 मध्ये हुडकेश्वर व नरसाळा भागाला नागपूर मनपाच्या सीमेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यावेळेस या भागात 3 पाण्याची टाकी नीलकंठ नगर (5 लक्ष लीटर क्षमता), हुडकेश्वर (1 लक्ष लीटर क्षमता), नरसाळा (1 लक्ष लीटर क्षमता) होती. तसेच 23.55 कि.मी. चे जलवाहिनीचे जाळे आणि 3259 घरांमध्ये नळाचे कनेक्शन होते.

मनपातर्फे पाण्याची पुरवठा सुधारण्यासाठी 4 नवीन पाणी टाकी बांधण्यात आली. या मध्ये संभाजी नगर, भारत माता नगर, ताजेश्वर नगर, चंद्रभागा नगर येथे प्रत्येकी 2.22 एम.एल. क्षमतेच्या टाकीचा समावेश आहे. मनपा तर्फे शासनाची विविध योजना-शहर वाढीव योजना अंतर्गत मुलभूत सुविधा, अमृत-1 आणि 2 च्या निधी मधून 220 किमीची जलवाहिनी टाकण्यात आली. यामुळे टँकर्सची संख्या कमी होण्यास मदत झाली.

आता हुडकेश्वर आणि नरसाळा भागात 13,850 घरांमध्ये पाणीचे नळ कनेक्शन आहे. यामध्ये 13,774 बंगले, 76 फ्लॅट स्कीम मध्ये 1355 फ्लॉट मध्ये पिण्याचे पाणी मिळत आहे. काही महिने एक दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. आता मनपा आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे 1 जुलै पासून दररोज पाणी दिल्या जात आहे आणि 1 ऑगस्ट पासून या क्षेत्राला टँकर मुक्त घोषित करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयुक्तांनी केली महाल परिसरातील केळीबाग व रामजी पहलवान रस्त्याच्या कामाची पाहणी

Fri Aug 2 , 2024
– मनपाच्या संयुक्त चमू द्वारे 5 ऑगस्ट रोजी निवाडा झालेल्या जागा ताब्यात घेण्याचे दिले निर्देश नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता:1) महाल परिसरातील केळीबाग व रामजी पहलवान रस्त्याची पाहणी केली. यावेळी आमदार प्रवीण दटके यांनी परिसरातील विविध समस्यांची माहिती आयुक्तांना दिली. नागपूर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त चमूद्वारे येत्या सोमवार 5 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!