नागपूर :- जे डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मेनेजमेंट, नागपुर येथे बांबू चा चुरा करणारी मानवी शक्तीवर चालणाऱ्या फ्लायव्हील मोटर ची ऊर्जेचा स्त्रोत म्हणून तपासणी करण्यात आली.
हे संशोधन बांबूच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या उपयोग करिता बांबू वापरला जातो जसे की, इमारत बांधकाम, खाद्यपदार्थ, औषधी मूल्य व इतर, ह्या कामाच्या पुढील प्रगती साठीचे पुढचे पाऊल आहे.
जे डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मेनेजमेंट, नागपुर चे प्राध्यापक व सल्लागार (तांत्रिक) डॉ. जे. पी. मोडक हे मानव चलित फ्लायव्हील मोटर आणि त्याचे वेगवेगळे उपयोग ह्याचे जगविख्यात संशोधक आहेत.
संदर्भित नवी ह्युमन मशीन सिस्टीम ही ह्युमन सिस्टीम टेक्नॉलॉजी लॅब, मुंबई ह्यांनी प्रायोजित केली आहे.
जे डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मेनेजमेंट, नागपुर चा प्राध्यापक गण जसे की, तेजस्विनी जूनघरे, कमलेश मेश्राम, गौरव रंगारी आणि विक्रांत काटेकर तसेच कार्यशाळा तंत्रज्ञ गोपाळ डोमके ह्यांनी ह्या तपासणी करिता सैद्धांतिक तसेच प्रायोगिक सहाय्य प्रदान केले.
संबंधित प्राध्यापक गण आणि कर्मचारी, जे डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मेनेजमेंट, नागपुरच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या सुविधेकरिता आभारी आहेत.